निघण्याआधीची उत्सुकता

5 March

हा प्रवास सुरु करतांना मी 5 मार्च पासून सुरुवात करेन , कारण हा सर्वच काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज मधुच्या सासरहून निघण्याचा दिवस. मी कालच रात्री मधुकडे राहण्यासाठी आले. मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. एकीकडे मितालीला भेटण्याची उत्सुकता व दुसरीकडे युवी आणि मधूला सोडून तीन महिने राहणार ही हुरहूर. युवराज जर एक आठवडाभर भेटला नाही तरी चुकल्यासारखे वाटते. आता तर तीन महिने प्रत्यक्ष भेटणार नाही! असो. खूप दिवसांनी भेटल्यावर प्रेम आणखीन वाढते.

चारूच्या आईने माझ्यासाठी काल वडापावची पार्टी केली होती. खूपच चवदार! जरा कंट्रोल करूनच खाल्ला मी. कारण चार-पाच दिवसापासून cough आणि खोकला झाला होता. खूप टेन्शन होते कारण एअरलाईन्सच्या साइटवर rt-pcr ची गरज नाही असे सांगितले होते पण प्रत्यक्षात काहीच सांगता येत नाही. कारण जर rt-pcr positive आली तर सगळाच घोटाळा आणि पैशाचा चुराडा.

आज जेवायला मटार कोबीची भाजी केली होती. चारूच्या आईचे आपलेपण प्रत्येक कृतीतून जाणवत होते. मधु पण अगदी जीवापाड जपत होती. युवराजपण सारखा मागेपुढे फिरत होता. मी जाईपर्यंत मधु काळजीपोटी अनेक सूचना देत होती. तिच्याकडे बघून मनात सारखी कालवाकालव होत होती पण काही पर्याय नव्हता या परिस्थितीला. कारण मितालीला भेटणे पण खूप गरजेचे आणि आवश्यक होते. आम्ही रात्री आठ वाजता खाली आलो. माझ्या मोठ्या bags मधूने हुशारीने खालीच गाडीत ठेवल्या होत्या, कि तीन मजले चढ-उतार नको म्हणून. अनिल महाजन गाडी घेऊन आला. साधारण साडेआठला रात्री निघालो आम्ही. खूप ट्राफिक होता. मी सव्वा अकराला सीमुकडे पोहोचले. ती आणि रवी वाट बघत होते. मग गेल्यागेल्या गरम पाण्याने अंघोळ केली, कपडे बदलले आणि मग गरम गरम जेवण केले, गरम सूप घेतले आणि मग शांत झोप लागली.

6 March

घराचे shifting आणि इकडून तिकडे येणे-जाणे यामुळे खूप थकवा आला होता. त्यामुळे सकाळी खूप उशिरा उठले सिमुने फ्लॉवर-वाटाणा-बटाटा-रस्सा भाजी केली. आम्ही पोळ्या केल्या. जेवण करून आम्ही राहिलेल्या खरेदीसाठी बाहेर पडलो. सर्वप्रथम मॅक्सचे शूज घेतले. नंतर अनेक सटर-फटर खरेदी, उदाहरणार्थ गहू बिस्किटे, खारी, नानकटाई, पेठा अशा अनेक वस्तू घेतल्या. टेन्शन होतेच. त्यामुळे कफ आणि खोकला होताच. सतत गरम पाणी घेत होते. सिमु आणि रवी खूप केअरिंग आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या कृतीतून आपलेपणा झळकत होता. मंगेश जास्त बोलत नाही पण तरीही त्याच्या बोलण्यातून आपलेपणा नक्कीच जाणवत होता. मी खूप नशीबवान आहे की मला आजूबाजूला प्रेम करणारी आणि जीव लावणारी माझी माणसे आहेत.

7 March

जशी माहेरपणालाच आली आहे. एका अर्थी ते खरेच आहे कारण रवि अगदी भावासारखीच काळजी घेतो. आज पण आरामात उठले, नाश्ता केला आणि मग आम्ही बाहेर पडलो. जरा bagच्या वजनाचा पण प्रॉब्लेम होताच. सिमु कडचा वजन काटा आणि माझे luggage scale यात तफावत येत होती. मग शेवटी सिमुच्या घरासमोर एक नवीन दुकान उघडले आहे तिथे विचारले की बॅगांचे वजन करून द्याल का? आमचे नशीब थोर की त्यांनी हो सांगितले. मग मी, रवी आणि सिमु, बॅगा घेऊन आमची वरात दुकानात! तिथे समजले की 19 किलो आणि 700 ग्रॅम मोठ्या bagचे आणि cabin bagचे आठ किलो 323 gm असे वजन आहे. मग घरी येऊन परत या बॅगेतले त्या बॅगेत करून मोठ्या बॅगेला lock करून टाकले. मग आम्ही डॉक्टर पुरंदरे म्हणून आहेत त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडून गोळ्यांचा रुटीन dose व प्रिस्क्रिप्शन घेतले खोकल्याच्या औषधासाठी, जे प्राचीने सुचवले होते. संध्याकाळचे जेवण करून मंगेशने मोठी गाडी मागवली व साधारण पावणे अकराला आम्ही निघालो.

सव्वाअकरा वाजता एअरपोर्टवर पोचलो. तिथे पोचल्यावर मितालीची एक फेसबुक फ्रेंड, तिचे नाव गौरी देशपांडे, तिचे आई बाबा पण सेम flightमध्ये माझ्या बरोबर होते. त्यांना फोन केला तर समजले त्यांचे सिक्युरिटी चेक-इन ऑलरेडी झाले होते. मग मी रांगेत उभी राहिले. माझा नंबर आल्यावर त्यांनी मला पासपोर्ट, visa, covid-सर्टिफिकेट आणि invitation लेटर मागितले; पैकी माझ्याकडे invitation लेटर नव्हते. मी लगेच मितालीला फोन करून ते मागवून त्यांना दाखवले. पुढे माझ्या bags वगैरे सर्व सामान स्कॅनिंग साठी बेल्टवर टाकले. आमचे गेट नंबर 72 होते. सर्व क्लिअर झाल्यावर आम्ही गेट नंबर 72 च्या loungeमध्ये बसलो. तिथे मला सतत खोकल्याची उबळ येत होती तेव्हा गौरीच्या आईने मला बोलता बोलता विचारले की तुम्हाला rt-pcr रिपोर्ट मागितला का? तुमची rt-pcr झाली होती ना? त्यावर मी त्यांना सांगितले की मला rt-pcr बद्दल काहीच विचारले नाही. तेव्हा मला जाणवले की खरोखर त्यांनी रिपोर्ट विचारला असता तर माझ्याकडे नसल्याने मला तिथेच रॅपिड टेस्ट करावी लागली असती आणि त्याचा रेट साडेतीन ते चार हजार आहे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असता तर मला परत डोंबिवलीला जाऊन आठ दिवसांनी परत एअरपोर्टला रिपोर्ट्स आणि परत flight बुकिंग म्हणजे हे सर्व एकंदरीत अगदी कमीत कमी बारा ते पंधरा हजाराचा चुना लागला असता!! देशपांडे पती-पत्नीनी उगाच रिस्क नको म्हणून पुण्याहून निघताना rt-pcr केली होती. फ्लाईट on-time होती.

रात्री अडीच वाजता बोर्डिंग सुरू झाले. पहिल्यांदाच इंटरनॅशनल प्रवास असल्याने पोटात गोळा आला होता पण सर्व सुरळीत पार पडले आणि मी विंडो सीटला स्थानापन्न झाले. खिडकीतून तसे काहीच दिसत नव्हते फक्त माझ्या बाजूच्या विमानाचा अजस्त्र पंख दिसत होता आणि खाली ढग. Takeoff खूप छान झाले, काहीच त्रास झाला नाही. माझ्या बाजूला एक फॉरेनर मुलगी होती पण तिला कशातच रस नव्हता ती लगेच झोपून गेली. मला भरपूर इंटरेस्ट होता की ती कुठली आहे, कुठे चालली आहे, काय करते वगैरे पण तिने माझा चांगला हिरमोड केला; चक्क न बोलता झोपून गेली. एकदम सकाळी उठली. तिने नाश्ता वगैरे काहीच घेतले नाही. रात्री फ्लाईटमध्ये बसल्याबरोबर एक cake पिस आणि एक व्हेज पॅटिस असे दिले. रात्री मला जवळजवळ दीड ते दोन तास झोपच लागली नाही आणि नंतर पाचच्या सुमारास मात्र गाढ झोप लागली त्यामुळे माझा सकाळचा ब्रेकफास्ट देतात तो miss झाला. सकाळी साडेसात वाजता जाग आल्यावर गरम कॉफी घेतली आणि रात्रीचा पॅटीस खाल्ला. आपल्याला इथली कॉफी अजिबातच आवडत नाही, खूप स्ट्रॉंग असते एकतर. दूध आणि साखरेचे वेगळे sachets देतात पण अगदी कमी प्रमाणात असते ते. साधारण सकाळी आठ वाजता Frankfurtला उतरले.

8 March

दुसरे flight 10:55चे होते. बोर्डिंग पास दाखवून परत सिक्युरिटी check-inच्या लाईन मध्ये, मग तिथून परत Berlinला जाणाऱ्या flightचे check-in! अगदी प्रॉपर होते. परत सगळे सामान स्कॅनिंग साठी ट्रेमध्ये काढणे, फिजिकल स्कॅनिंग हे सगळे झाल्यावर Berlinच्या flight मध्ये बसले. साधारण एक तासाचा प्रवास होता. बसल्यावर पाण्याची छोटी बाटली आणि चॉकलेट दिले. या flightचे पण takeoff आणि landing एकदम smooth होते. Air turbulence अजिबात नाही! नंतर flight मधून उतरल्यावर परत दोन एलीवेटर उतरून, खाली जाऊन, baggage claim सेक्शन मध्ये जाऊन मोठी बॅग घेतली. एक्झिट मधून बाहेर पडल्यावर असे झाले होते की कधी एकदा मिताली दिसेल.

पण मितालीने मागून येऊन एकदम मिठी मारली आणि ती भेटल्यावर माझ्या जिवात जीव आला. मग आम्ही कनेक्टेड ट्रेन ने Potsdamला गेलो. ट्रेन बर्लिनच्या बाहेरून जात असल्याने आजूबाजूला मोकळा परिसर आणि झाडे होती, पण सगळे yellow yellow गवत! हिरवेपणाचा मागमूस नाही. मिताली सांगत होती की अजुन साधारण महिन्यानंतर springमध्ये हे सर्व एकदम बदलून जाईल व सगळीकडे हिरवळ व रंगीबेरंगी फुले यांची बहार उडेल. थंडी एकदम कमी होईल वगैरे वगैरे. ट्रेन एकदम पॉश आणि अजिबात गर्दी नाही. वेळ साधारण 25 ते 30 मिनिटे. तिथून मितालीच्या अपार्टमेंटपर्यंत पाच मिनिटे चालावे लागते आणि मितालीने आल्या आल्या कपडे बदलून भाताचा कुकर लावला आणि मग आम्ही लगेच जेवायला बसलो.

जेवणाचा बेत अगदी रुचकर होता. पोळ्या, फोडणीची, आमटी-भात, कांद्याच्या पातीची भाजी आणि गोड शिरा. भात सोडून सर्व स्वयंपाक करून ती मला घ्यायला आली होती. खूप खूप अभिमान वाटला मला तिचा. जेवण झाल्यावर झोपायचे ठरवले होते पण अती आनंदामुळे झोप येईना. मग तिने चहा केला. मग आम्ही चहा घेऊन संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. त्यादिवशी सकाळी 8 डिग्री टेंपरेचर होते; संध्याकाळी 3 डिग्रीपर्यंत खाली आले होते. त्यामुळे सर्व जामानिमा, म्हणजे थर्मल, टी-शर्ट, पॅन्ट, स्वेटर आणि त्यावर मोठा कोट, टोपी आणि हो, कानात कापूस, असे आम्ही अर्धा ते पाऊण तास फिरून आलो. अतिशय शिस्तबद्ध बांधलेली सुबक घरे, समोर बगीचा आणि गॅरेजमध्ये छोटीशी गाडी अशा नेटकेपणाने सर्व घरे सजली होती. तिकडे गव्हर्मेंट कडून प्रत्येक घराला दोन मोठी चाके असलेली dustbins मिळतात- रंग काळा, निळा, पिवळा. त्यातच कचरा टाकायचा. रस्त्यावर कुठेही कचरा कुंडी दिसली नाही. दररोज ते लोक येऊन ड्रम रिकामे करतात. कुठेही कचऱ्याचे ढीग नाहीत. सर्व रस्ते एकदम चकाचक.

German regional train (Deutsche Bahn)
Germanyमधला bungalow

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply