Memorial to Jews

मग चालत चालत आम्ही “मेमोरियल टू दि murdered jews ऑफ युरोप”ला गेलो. खूप भव्य आहे. केवढा तरी मोठा परिसर. म्युझियम अंडरग्राउंड आहे आणि म्युझियमच्या वरती असा लुक निर्माण केला आहे जसे काही अनेक थडगी एकत्र असल्यावर जसा लुक येईल. नंतर बाजूला मोठमोठ्या वॉल एवढी थडगी-टाईप डिझाईन आहे. आमचा नंबर आल्यावर, पंधरा-सोळा पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक दरवाजा उघडला. तिथे एक-एकलाच आत मध्ये घेतात. आत गेल्यावर तुमचा कोट, बॅग, मफलरचे एअरपोर्टसारखे स्क्रिनिंग होते.

Jewish memorial

आत गेल्यावर भिंतीवर 1939-1944पर्यंत चा इतिहास फोटो व माहिती स्वरूपात जर्मन व इंग्लिश मध्ये चितारला आहे. Jew लोकांवर हिटलरच्या काळात झालेले अत्याचार व अन्याय यांचे डॉक्युमेंटेशन अतिशय परिणामकारकरित्या करून ठेवले आहे. आतमधल्या रुम मध्ये गेले की भिंतीवर jew फॅमिलीs ची फॅमिली हिस्ट्री, त्यांचे फोटो आणि कुठल्या यातना तळावर त्यांना नेले की मोबाइल squadमध्ये मारले गेले की गॅस चेंबरमध्ये मृत्यू झाला हे दाखवले आहे. यातना तळावरून नातेवाईकांना लिहिलेली पत्रे मूळ स्वरूपात काचे खाली ठेवली आहेत. तिथेच खाली त्याचे इंग्लिश भाषांतर पण आहे. तसेच कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काम करणारे पण non-jewish लोकांनी लिहिलेली पत्रे तिथे ठेवलेली आहेत. ते सर्व वाचून आणि बघून हृदयाला पीळ पडल्यासारखे होते. त्या सर्व दुर्दैवी जीवांबद्दल अपार अनुकंपा दाटून येते आणि जाणवते ते हेच की तुमचा देश, तुमचे सरकार व्यवस्थित असेल तरच तुम्ही खर्‍या अर्थाने सुरक्षित आहात. नाहीतर लाखो jewsचे जे झाले ते किती भयंकर होते हे तिकडे बघितल्यावरच कळते.

कितीतरी युरोपियन देशांमध्ये jewsच्या बाबतीत हेच घडले. सगळ्यात जास्त पोलंड, जर्मनी, नेदरलॅंड, czech रिपब्लिक, ऑस्ट्रिया, हंगेरी, युक्रेन इत्यादी ठिकाणी जास्त प्रमाणात ज्यूंचे शिरकाण झाले. ग्रीस, इटली, बेल्जियम येथे कमी प्रमाणात झाले. त्यावेळी जे धनाढ्य होते ते पैशाच्या जोरावर लंडन, अमेरिका इकडे पळून गेले आणि स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवला. पण ज्यांना शक्य झाले नाही ते हिटलरच्‍या क्रूर नाझींच्या हातात सापडले. आधी सर्वप्रथम jewsना वेगळे काढले गेले, त्यांच्या वसाहती तयार केल्या गेल्या, मुख्यतः Germany आणि पोलंडमध्ये. त्या वसाहतींना ghetto असे नाव होते. या वसाहतीत राहणाऱ्यांना, बाकी जर्मन राहतात तिथे प्रवेश नव्हता. त्यांना या फुटपाथ वरून त्या फूटपाथवर जायचं असेल तर, आणि जर आजूबाजूला germans राहत असतील तर, किंवा त्यांच्या जाण्यायेण्याचा कारचा रस्ता असेल तर, पूल बांधून jew लोकांनी पुलावरून ये-जा करायची. Jew लोकांना आयडेंटिफिकेशन markची सक्ती होती. एकतर हातात बँड असायचा नाहीतर yellow स्टार. त्यामुळे जर रस्त्याने jew जात असेल तर पटकन ओळखू यायचा. त्यांना कपडे पण stripesचे वापरायची सक्ती होती.

काही काळाने हिटलरने मोबाईल किलिंग squadची स्थापना केली. तोपर्यंत jew घरात सुरक्षित होते पण नंतर ते बाहेर असले आणि मोबाईल किलिंग squadच्या दृष्टीस पडले, तर लगेच shoot-at-sight करायचे. नंतर हिटलरच्या डोक्यात ती अमानवी कल्पना आली, की संपूर्ण युरोप jews-free करायचा. त्यासाठी सगळ्या युरोपमध्ये ठिकाणी यातनातळ उभे करायचे. रेल्वे वॅगन्समधून jews भरभरून आणायचे आणि सर्वजण जेमतेम उभे राहतील एवढीच जागा, म्हणजे जास्तीत जास्त jew एका फेरीत येतील. कारण हा प्रवास अनेक दिवसांचा असायचा. यातनातळावर पोहोचेपर्यंत अगदी लहान मुले आणि वृद्ध प्रवासातच राम म्हणायचे. जे जिवंत राहायचे ते अगदी थकलेले असायचे. परत त्यांचे, स्त्रिया आणि मुले एका बाजूला आणि पुरुष एका बाजूला, असे वर्गीकरण व्हायचे. अशक्त लोकांना लगेचच एका ठराविक अंतरावर टेकडीच्या पलीकडे नेऊन पूर्णतः अंगावरचे कपडे काढून पालथे पडण्यास सांगायचे. त्याआधी त्यांच्या अंगठ्या, chainवगैरे मौल्यवान वस्तू नाझी ताब्यात घ्यायचे. आणि मग त्यांना गोळ्या मारून ती सर्व प्रेते भट्टीत जाळून टाकायचे. त्यानंतर नंबर असायचा तो नाजूक स्त्रिया आणि मुले. पहिल्यांदा जे वर्किंग होते त्यांना वाटायचे की कामाच्या बदल्यात जीवदान पक्के. त्यामुळे बरे नाही किंवा काम करू शकत नाही म्हणजे मृत्यूला आमंत्रण. म्हणून हे सर्व जिवाच्या आकांताने काम करायचे. बरे हे सर्व सुरू असताना बाहेरच्या जगात या यातना स्थळाची माहिती वेगळ्याच स्वरूपात दाखवली जायची. त्यांना सांगितले जायचे की या कॅम्पमध्ये jews ठेवले आहेत कारण ते आपल्यातले नाहीत, वेगळे आहेत. पण कॅम्पवर त्यांना त्यांच्या गरजेच्या, तसेच मनोरंजनाच्या गोष्टी पुरवल्या जातात पण प्रत्यक्षात गॅस चेंबरमध्ये जाईपर्यंत कुणालाच काही पत्ता नसायचा. यासंदर्भातला एक सुंदर सिनेमा आम्ही मागच्या आठवड्यात पाहिला- The Boy with Stripped Pyjamas. अप्रतिम, मन हेलावून टाकणारा सिनेमा! So, moving on..

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply