प्रस्तावना
नमस्कार मंडळी, खरेतर आजकाल युरोपचा प्रवास करणे ही काही विशेष गोष्ट नाही अगदी सामान्य झाले आहे सध्याच्या काळात. पण माझ्यासाठी मात्र ही गोष्ट खूप खास, अगदी मर्मबंधातली ठेव आहे. माझा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास. त्यातून शिकत असताना मिळालेल्या स्टायपेंड मधून स्वतःचा खर्च करून तसेच दरमहा काही ठराविक रक्कम माझ्यासाठी पाठवुन मित्तलने माझी सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर अगदी समर्थपणे पेलली आहे. आणि मला तिचा खूप खूप अभिमान आहे. परदेशात राहून मित्तल माझ्याप्रती तिचे सर्व कर्तव्य पार पडते तर इतर वेळी हा आधार मला मधु आणि चारूकडून मिळतो.
मितालीला आता जर्मनीत जाऊन चार वर्षे झाली, तो सर्व काळ, तसेच मकरंद गेल्यानंतरच्या काळात माझी सर्व जबाबदारी मधु आणि चारूने अगदी लीलया सांभाळले. यामध्ये मधूच्या सासू-सासरे या दोघांनीही मला आपले मानले. कधीच परकेपणा जाणवू दिला नाही. मकरंद गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरायला मला मदत झाली ती युवराजची. युवराजचे निरपेक्ष प्रेम मला नवीन उमेद देऊन गेले. त्याचे माझ्यावरचे प्रेम म्हणजे माझ्यासाठी शिंपल्यातला अनमोल मोती आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते.
पुढे वाचा…

आमची भ्रमंती








असेच काही फोटोज














Leave a Reply