
Covid vaccination appointment (14 March)
आज माझा व्हॅक्सिनेशन डे. सकाळी नऊची अपॉइंटमेंट होती. माझे दोन व्हॅक्सिनेशन डोस आधीच इंडियामध्ये झालेले आहेत पण मी इथे तिसऱ्या डोससाठी एलिजिबल आहे म्हणून मितालीने सांगितले की तू व्हॅक्सिनेशन घेऊन टाक. त्याचा आणखीन एक फायदा असा की त्या नंतर युरोपमध्ये फिरतांना परत परत rt-pcr टेस्ट करण्याची गरज राहणार नाही.
Day trip (19 March)
आज आम्ही बर्लिनमध्ये फिरणार आहोत. त्याआधी आम्ही श्रद्धा गुरवला भेटू, तिच्या बाबांनी दिलेले सामान द्यायला. तिचे बाबा सिमुच्या ऑफिसमध्ये आहेत. Berlin स्टेशनला आम्ही श्रद्धाला भेटलो. एकदम लाघवी आणि उत्साही मुलगी. तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या. ती गोरिला फूड्स ट्रांसपोर्टमध्ये नोकरी करते व हेरिटेज कंजर्वेशनमध्ये MS करते आहे. तेथे बर्लिनला ती आणि अजून चार-पाच जण अपार्टमेंट शेअर करून राहतात. इथे आपल्या झोमॅटो, स्विगी सरखे Gorilla, Wolt असे food delivery services आहेत. या companies तिथे पार्ट-टाइम जॉब करणाऱ्यांना सायकल प्रोव्हाइड करतात. म्हणजे मुलांना पैसे पण मिळतात आणि सायकलिंग मुळे व्यायाम पण होतो.
दुपारच्या जेवणासाठी आम्ही डोलोरेस मध्ये मेक्सिकन डिश Nachos with Burrito bowl हे खाल्ले. दोघांमध्ये एकच bowl ऑर्डर केला कारण पोर्शन साइज फार होता. आपल्यासारखे तिखट नसले तरीसुद्धा चविष्ट होते. मग आम्ही Cloer नावाच्या Waffle houseमध्ये गेलो. तिथे फ्रेश waffles मिळतात. आम्ही white चॉकलेट व Mango with pineapple sauce waffle घेतला. हा मला खूपच आवडला. Waffle दिसताना मधाचे पोळे जर पसरले तर कसे दिसेल तसे दिसते.


मग आम्ही Brandenburg Gateला गेलो. Berlinमधले हे सर्वात प्रसिद्ध स्थळ आहे. तिथे खूप गर्दी असते. Gate 25-26 meter उंच असून त्याला supportला 5 खांब आहेत. नंतर वरती 4 घोडे जूम्पलेले असून गरुडाच्या हातात त्यांचे सारर्थ्य आहे. एकदम स्वर्गाच्या दरवाजाशी उभे आहोत असे वाटते.



आम्ही अंडरग्राउंड रेल्वेने Berlin Eastच्या लास्ट स्टेशन ला उतरलो. तिथे एका नेपाळ्याचा मोमोज स्टॉल आहे, व्हेज आणि नॉन व्हेज मोमोज. तिथे व्हेज मध्ये spinach आणि व्हेजिटेबल मोमो मिळतात. बरोबर टोमॅटो चटणी आणि लाल चटणी देतात. पैकी लाल चटणी खूप तिखट आहे. आम्ही जास्तीत जास्त लाल चटणी tissue paperला पुसून मग मोमोज एन्जॉय केले. मला खरंच आश्चर्य वाटले की युरोपमध्ये एवढे तिखट serve करतात. एवढी कमी प्रमाणात लाल चटणी खाऊन देखील तोंडाची आग आग होत होती. मग आम्ही Merci चॉकलेटचा एक बार काढून खाल्ला.


Memorial to the Murdered Jews of Europe (19 March)
मग चालत चालत आम्ही “मेमोरियल टू दि murdered jews ऑफ युरोप”ला गेलो. खूप भव्य आहे. केवढा तरी मोठा परिसर. म्युझियम अंडरग्राउंड आहे आणि म्युझियमच्या वरती असा लुक निर्माण केला आहे जसे काही अनेक थडगी एकत्र असल्यावर जसा लुक येईल. नंतर बाजूला मोठमोठ्या वॉल एवढी थडगी-टाईप डिझाईनs आहे. आमचा नंबर आल्यावर, पंधरा-सोळा पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक दरवाजा उघडला. तिथे एक-एकलाच आत मध्ये घेतात. आत गेल्यावर तुमचा कोट, बॅग, मफलरचे एअरपोर्टसारखे स्क्रिनिंग होते.

Berlin wall (19 March)
मग last stop, Berlin वॉल कडे आम्ही कूच केले. हिटलरचा बिमोड झाल्यावर ईस्ट जर्मनी रशियाने ताब्यात घेतली व वेस्ट जर्मनी capitalist अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स यांनी ताब्यात घेतली. हा काळ दुसऱ्या महायुद्धानंतर चा होता. रशियामध्ये कम्युनिजम असल्यामुळे East जर्मनीमध्ये पण कम्युनिझम लादला गेला.

Museum Day (3 April)
आज आमचा म्युझियम डे आहे. Berlinमध्ये बरीच म्युझियम्स आहेत. मितालीने त्यातील पाच सिलेक्ट केली. मितालीने निघतानाच युनिव्हर्सल पास काढला. युनिव्हर्सल पास म्हणजे तुम्ही ट्रेन, बस, tram याने त्या 24 तासात कितीही प्रवास करू शकता.
प्रथम आम्ही नॅचरल हिस्ट्री म्युझियम ला गेलो. तिथे गेल्या गेल्या अतिप्रचंड Tyrannosaurusचा सांगाडा दृष्टीस पडला जवळजवळ दोन मजली उंच सांगाडा होता!

Berlin Zoo (2 June)
आज आम्ही Berlin zoo बघायला गेलो. बरोबर मिताली फ्रेंड्स Deep व Shreya पण होते. मला फक्त फुल तिकीट काढावे लागले, बाकी तिघांना स्टुडंट कन्सेशन होते. Zooमध्ये शिरण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. आम्ही जिथून आत शिरलो तिथे बाजूलाच ऑफिस होते. ऑफिसमधून zooचा नकाशा घेतला. आम्हाला समोरच हत्ती दिसले. एकदम सुरुवातीलाच गणपती बाप्पाचे दर्शन झाले, समाधान वाटले. तिथून पुढे गेल्यावर Capricorns दिसले. त्यांच्या अधिवासासाठी उंच-सखल डोंगर तयार करून त्यात गुहा निर्माण केल्या होत्या. त्यांची छोटी बाळे त्या डोंगरावर मस्त विहार करत होती. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला Meerkats (मीरकट्स) दिसले. त्यांच्यासाठी त्यांना बिळे तयार करता येतील अश्या भुसभुशीत रेतिच्या छोट्या-छोट्या टेकड्या तयार केल्या होत्या. काही मीरकट्स एकदम सरळ उभे राहून गर्दीला न्याहाळत होते, तर काही पाठशिवणीचा खेळ खेळत होते. काहीजण बिळाचा वापर करून लपाछपी खेळत होते.









Leave a Reply