8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो. तीन मजल्यावर त्या दुकानाचा पसारा होता. आम्ही तिथे खाद्यतेलाच्या शोधार्थ गेलो होतो पण आम्हाला तेल मिळालेच नाही. आम्ही फिरून फिरून खूप थकलो होतो मग सामान घेऊन मी एका बेंचवर बसले. तोपर्यंत मिताली एक आईस्क्रीम कोन घेऊन आली. मग तिथून काही अंतरावर असलेल्या Asian फाइव्ह -इन-वन स्टोअर मध्ये गेलो. तिथे आम्ही गूळ, कोथिंबीर, दुधी, हिरव्या मिरच्या, तसेच तिथे तिळाची (Turkish) बिस्किटे घेतली.

तिथून बसने आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. मिताली म्हणाली, आई ही ट्रेन गेली तर तासभर आपल्याला दुसरी ट्रेन नाही त्यामुळे जरा लवकर लवकर चल. आमची ट्रेन तिसऱ्या मजल्यावर होती आणि प्रत्येक मजल्यावर वेगळी लिफ्ट असते. म्हणजे ग्राउंडहुन एका मजल्यावर आले की दुसऱ्या मजल्यासाठी थोडे चालत जाऊन दुसरी लिफ्ट फर्स्ट फ्लोअर, परत चालत जाऊन दुसरी लिफ्ट सेकंड फ्लोअर. त्यामुळे आम्ही जेमतेम ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेन सुरु झाली. आम्ही हुश्श करत वरच्या मजल्यावर गेलो कारण खाली बसायला जागाच नव्हती.

आम्ही जरा सेटल झाल्यावर आजूबाजूला बघितले तर एक गृहस्थ, साधारण 70-75 च्या आसपास असावेत, आमच्या समोरच्या सीटवर बसून आमच्याकडे बघत होते; का ते माहीत नाही पण सर्व जरा विचित्रच होते. कारण usually युरोपमध्ये कोणीच कोणाकडे बघत नाही. असे बघत राहणे तर बॅड मॅनर्स! आतमध्ये शिरल्याबरोबर मितालीला क्लिक झाले कि रिटर्न तिकीट पंच करायचे राहिले! तिथे विदाऊट तिकीट travel साठी मजबूत दंड आहे. तिचा पास होता पण माझे तिकीट punch करायचं राहिले होते. मला ते कळले नव्हते पण त्या समोरच्या माणसाच्या सतत बघण्याने मी तिला हळूच विचारलं- हा माणूस आपल्या दोघींकडे का बघतोय? मिताली म्हणाली- मला पण माहित नाही, पण मग तिने मला हळूच सांगितले की तुझे तिकीट पंच करायचे राहिले. समजा टीसी आला तर तु दुसर्‍या दिशेने वॉशरूम कडे जा. समोरचा माणूस टीसी तर नाही ना? तर मिताली म्हणाली- नाही नाही, टीसी तर वाटत नाही. त्याच्याकडे जी टिपिकल बॅग असते ती नाहीये.

त्यावेळी माझी स्थिती काय होती हे मी सांगू शकत नाही. आम्ही काही जाणून बुजून नक्कीच केले नव्हते कारण येताना punch केलेले तिकीट होते आमच्याकडे, पण टीसी लोकांचा भरोसा नाही आणि तेवढ्यात मितालीने सांगितले की खालच्या मजल्यावर टीसी आला आहे, तू पटकन जा WCमध्ये. माझ्या काळजाचा ठोका चुकला. या सगळ्यात कहर म्हणजे तो समोरचा माणूस मिताली व माझ्याकडे बघतच होता. मितालीपण जरा घाबरली. ती म्हणाली, तुझा फोन दे. मग लगेच मी दुसऱ्या दिशेने गेले आणि त्या काळात काय काय विचार मनात चालू होते विचारता सोय नाही! उदा. मी WCमधून बाहेर आले आणि समोर दत्त म्हणून TC उभा राहिला तर? माझा फोन माझ्याकडे नाही आणि समजा माझी मितालीबरोबर चुकामुक झाली तर? माझ्याकडे युरोपीय चलन नाही. जर कुणाला फोन करायचा तर माझ्याकडे पैसेच नाहीत व भारतात फोन करायचा म्हटला तर मधु, सिमु, चारू यांचे नंबर मला पाठ होते पण तिथे मी कम्युनिकेट कोणाशी करणार? तिथे खूप कमी जणांना इंग्लिश येते आणि माझे German अगदीच तोडके-मोडके. मी खूप वेळ थांबले. मग जरा वेळाने बाहेर येऊन वरच्या मजल्यावर जिथे मिताली बसली होती तिथे जायचे म्हणून जाणार, एवढ्यात मितालीने पाठीमागून मला हात लावला! जरा घाबरतच वळून पाहिले तर मिताली होती समोर! अक्षरश: मणामणाचे ओझे उतरल्याचा भास झाला. मी तिला पहिला प्रश्न हाच विचारला- TC येऊन गेला का? तर ती म्हणाली- अगं आलाच नाही, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये, विरुद्ध दिशेला गेला! तिला पण हीच धास्ती- चुकामूक व्हायला नको आणि आम्हाला लगेच दोन मिनिटात उतरायचं होतं. जर मी WCमधून बाहेर आले नसते तर आमचं स्टेशन चुकलं असतं व train वेगळ्या डायरेक्शनला गेल्यामुळे परत उलटे येऊन, परत एक तास उशीर झाला असता, दुसरी ट्रेन येईपर्यंत! असो. देव पाठीशी होता! खाली उतरून आधी मी तिला कडकडुन मिठी मारली आणि मग दुसऱ्या ट्रेनने आम्ही घरी आलो.

10 April

आज सकाळी उठल्यावर नाश्ता झाल्यावर आम्ही आधी आमची 12 तारखेला जाण्यासाठी बॅग भरली. 12 तारखेला पहाटे साडेचारची बस आहे. त्यासाठी सव्वाचारला घरातून बाहेर पडलेच पाहिजे. मितालीने आणि मी सर्व आठवून आठवून बॅग भरली. रात्री मिताली टिकिट्स आणि इतर बरेच काही तपासात बसली होती. तिने सगळा प्लॅन अगदी मिनिटागणिक हिशोब करून तयार केला होता. मला अगदी मकरंदची आठवण आली; तसेच अगदी बारीक पण स्वच्छ अक्षरांमध्ये एका पेपरवर सगळे लिहून घेतले होते. नंतर सेफ-साईड म्हणून ते सर्व मोबाईलमध्ये save केले. बापरे! मला अगदी अजूनही लहान वाटत असलेली मिताली प्रत्यक्षात खुप मोठी झाली आहे आणि matured पण! नंतर आम्ही ज्या राज्यात जाणार तिथे काय काय बघायचे हे ठरवले. तिथे कॉम्बिनेशन तिकीट हा प्रकार असतो. मग ते कॉम्बिनेशन तिकीट कम्पॅरिझन करून त्यातल्या त्यात कुठले स्वस्त आहे आणि तरीही काही बघायचं राहत नाही ना हे सर्व मितालीने डोळ्यात तेल घालून बघितले आणि मग रात्री साडेअकरा वाजता सर्व क्लिअर करून आम्ही झोपलो.

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply