Easter trip (12 April)

Munich

आम्ही पहाटे तीन वाजता उठलो. आंघोळ आदल्या रात्रीच केली होती, त्यामुळे उठून ब्रश केला आणि चहा घेऊन आम्ही सव्वाचारला घराबाहेर पडलो. साडेचारच्या बसने रिजनल ट्रेन स्टेशनला जाऊन तिथून त्या ट्रेनने निघालो. ट्रेन अगदी वेळेवर होती. ती ट्रेन Berlin स्टेशनला 5:20ला पोहोचणार होती पण नशीब असे की आमचे स्टेशन यायच्या दोन-तीन मिनिटे आधी ती ट्रेन अचानक थांबली. ती चक्क दहा मिनिटे! म्हणजे साडे पाच पर्यंत आणि नंतर ती 5:33 ला Berlin स्टेशनला पोहोचली. त्यामुळे आमची जी नंतर Berlin-Munich ट्रेन होती ती 05:34 होती आणि सलग पाच तास प्रवास करून आम्ही Munichला बारा वाजता पोचणार होतो. पण आमची ट्रेन चुकली. खूप धावपळ करत आम्ही प्लॅटफॉर्मला पोहोचलो पण दोन-तीन मिनिटापूर्वी ती ट्रेन गेलेली. मग मिताली इन्फॉर्मेशन सेंटरला गेली. मी तिथे सर्व सामान घेऊन थांबले. ती इन्क्वायरी करून आली. तिच्या म्हणण्याप्रमाणे आता पुढचा प्रवास टप्प्याटप्प्याने करावा लागणार होता. पण काय करणार. मग first train मिळाली ती Erfurtपर्यंत; मग तिथून second ट्रेन Nuremburgपर्यंत आणि third ट्रेन Munichपर्यंत. आम्ही 12:45ला स्टेशनला पोचलो. स्टेशनजवळ रोड cross केला की आमची रूम होती. तिथे आम्ही पेन्शन Locarno नावाचे motelमध्ये रूम घेतली होती. या motelमध्ये रूम सेपरेट होती. Washroom आणि टॉयलेट common होते. साधारण पाच रूमs ला एक असे वॉशरूम असते. याला सेपरेट किचन नसते. रूममध्येच गरम पाण्याची किटली, छोटा फ्रिज असे होते. मस्त होती खोली एकदम.

दुपारी तीन वाजता आम्ही निघालो. मग BMW म्युझियम पाहिले, नंतर ऑलिंपिक पार्क पाहिले. ऑलिंपिक पार्क एवढे प्रचंड आहे की दीड तासात आमचा फक्त 1/10th पार्क बघून झाला. ऑलिंपिक पार्कमध्ये मला चारू आणि युवीची खूपच आठवण आली, कारण फिटनेसवाल्यांसाठी एकदम मस्त जागा आहे. तिथे एक सुंदर सरोवर होते, तिथे आम्ही जरा वेळ पाण्यात पाय सोडून बसलो. अनेक बदके तिथे विहार करत होती. खूपच नयनरम्य दृश्य होते ते.

नंतर आम्ही चालत चालत पॅलेस गार्डनला आलो. भव्य प्रासाद आणि भरपूर मोठे Garden. तिथे अतिशय सुंदर फुलांची बॉर्डर तयार केली होती. खूपच रमणीय होते ते सर्व! आणि परत एकंदरीत सर्व वातावरण असे होते की थकवा जाणवतच नव्हता. ही सर्व ठिकाणे आसपासच असल्याने आम्हाला Day तिकीटची अजिबातच गरज भासली नाही. तिथून आम्ही वॉटर सर्फिंग बघायला गेलो. तिथे खळाळत्या पाण्यावर Surf बोर्डच्या साह्याने अनेक माणसे सर्फिंग करत होती. त्यात मुले-मुली व मध्यमवयीन पण होते. जर्मनीत वॉटर surfingचे बरेच वेड आहे. आम्हाला ट्रेनने फिरताना बरेचजण surfboards नेताना दिसले होते. मग आम्ही सिटी सेंटर मध्ये गेलो. Berlinमध्ये अजिबात तेल मिळाले नाही म्हणून इतक्या लांब म्युनिकमध्ये तरी तेल मिळते का बघू. पण तिथे पण तेल मिळाले नाही. तिथे आम्ही गरम-गरम french fries खाल्ले आणि हॉस्टेलला आलो.

Zugspitze (13 April)

सकाळी सर्व आवरून आम्ही ट्रेनने Garmisch या स्टेशनला आलो. तिथे रेल्वेच्या locker रूममध्ये सर्व सामान ठेवले व मोजके सामान, म्हणजे एक छोटीशी bag- त्याच्यामध्ये पाण्याची बाटली आणि माझी पर्स, एवढेच घेऊन आम्ही टॉय ट्रेनने Lake Eibsee या पॉइंट पर्यंत आलो. तिथे cable carचा पॉइंट होता.

The Zugspitze– जर्मनीतील सर्वात उंच ठिकाण! याची उंची 2960 मीटर्स एवढी आहे. इकडे आजूबाजूला आल्प्सच्या पर्वतरांगा आहेत. काही पर्वत हिरवेगार तर काही बर्फाच्छादित. टॉय ट्रेनचा शेवटचा stop ग्लेशियरपर्यंत व त्याच्यापुढे केबल car. Glacierच्या भागात अनेक लोक skiing करतात. केबल कारमध्ये एका ट्रिपला साधारण पन्नास ते सत्तर माणसे असतात. केबल कारमध्ये एका कॉर्नरला बेंच असतो, बाकी तिन्ही ठिकाणी धरण्यासाठी स्टीलचे मजबूत rods असतात. केबल कार मधून हळूहळू वरती जाताना पहिल्यांदा सर्व लहान-लहान दिसायला लागते. मग ग्लेशिअर्स दिसायला लागतात आणि मग मात्र केबल कारचा वेग वाढतो. साधारण दहा मिनिटात आपण जवळजवळ तीन हजार मीटर उंच पोचतो.

पुढे वाचा…

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply