Berlin Zoo

2 June

आज आम्ही Berlin zoo बघायला गेलो. बरोबर मिताली फ्रेंड्स Deep व Shreya पण होते. मला फक्त फुल तिकीट काढावे लागले, बाकी तिघांना स्टुडंट कन्सेशन होते. Zooमध्ये शिरण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. आम्ही जिथून आत शिरलो तिथे बाजूलाच ऑफिस होते. ऑफिसमधून zooचा नकाशा घेतला. आम्हाला समोरच हत्ती दिसले. एकदम सुरुवातीलाच गणपती बाप्पाचे दर्शन झाले, समाधान वाटले. तिथून पुढे गेल्यावर Capricorns दिसले. त्यांच्या अधिवासासाठी उंच-सखल डोंगर तयार करून त्यात गुहा निर्माण केल्या होत्या. त्यांची छोटी बाळे त्या डोंगरावर मस्त विहार करत होती. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला Meerkats (मीरकट्स) दिसले. त्यांच्यासाठी त्यांना बिळे तयार करता येतील अश्या भुसभुशीत रेतिच्या छोट्या-छोट्या टेकड्या तयार केल्या होत्या. काही मीरकट्स एकदम सरळ उभे राहून गर्दीला न्याहाळत होते, तर काही पाठशिवणीचा खेळ खेळत होते. काहीजण बिळाचा वापर करून लपाछपी खेळत होते.

Berlin Zooमधला Lion
Elephants
Flamingoes
Wild cat
Ocelot
Iguana

पुढे आम्हाला दोन-तीन प्रकारचे गरुड दिसले त्यांच्यासाठी एक मोठा घुमटाकार पिंजरा होता. त्यातच तीन-चार मोठ मोठी झाडे होती. त्यामुळे ते मोठ्या ऐटीत या झाडावरून त्या झाडावर उडत होते. अर्थात गरुडासारखा अथांग आकाशात विहार करणाऱ्या पक्षीराजासाठी ते अगदीच खुराडे होते असे म्हणायला हरकत नाही. नंतर आम्ही एक अवाढव्य हिप्पो पाहिला. त्याचे कातडे म्हणजे जणू काही ओली मळकट पोती अंगावर टाकले आहेत असे वाटत होते. त्याची निवांत वामकुक्षी चालू होती. पुढे Baboon जातीची माकडे दिसली. त्यांच्यासाठी पण डोंगर, मध्ये कपारी, झाडे असे तयार केले होते. दुसऱ्या एका डोंगरावर Macaque जातीची माकडे होती. त्यांना डोंगरावर चढण्यासाठी शिड्या ठेवल्या होत्या, तसेच मोठी गुहा पण होती. लहान मोठे डोंगर तयार केले होते.

Rhinoceros
Antelopes
Alpacas
Mules
Capybara
Zebras

एके ठिकाणी खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही तेथे डोकावलो तर तिथे सी लायन (Sea lion) ट्रेनिंग चालू होते. ट्रेनरकडे मासे असलेली बादली होती. ट्रेनर जशी ऍक्शन करेल त्याप्रमाणे सी लायन करायचा. ट्रेनरने हाताने हवेत गोल आकाराची खूण केली की तो लगेच त्या आकारात उडी मारायचा. ट्रेनने बादलीतून लांब पाण्यात मासा फेकला की डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत पाण्याखालून वेगाने तो मासा पकडून परत ट्रेनरकडे हजर! ट्रेनरने त्याला shake-hand केले की तो पण ट्रेनला shake-hand करायचा. ट्रेनरने त्याचे लाड केले की तो पण ट्रेनला तसेच करायचा. त्याचे वजन सुमारे तीनशे किलो इतके असून त्याच्या हालचाली अचूक होत्या. अतिशय लीलया तो सर्व हालचाली करत होता. खरोखरच समुद्राचा राजा हे बिरुद तो मिरवत होता. मग आम्ही Empire of cats बघायला गेलो. त्यांच्यासाठी जमिनीच्याखाली तळघरात वेगवेगळे पिंजर्‍यात ठेवले होते. त्यात दोन-तीन प्रकारच्या जंगली मांजरी, Mongooseच्या 2/3 जाती, मोठ्या चिचुंद्रीसारखे प्राणी, Iguana नावाच्या अजस्त्र आणि विषारी पाली, वटवाघुळ असे अनेकविध प्राणी होते. वर आल्यावर एका अवाढव्य खडकावर तीन सिंह दिसले. पैकी दोन जण ऊन खात पेंगत होते. एकाने मात्र आम्हाला छान पोज दिली! आम्ही झेब्रा, जिराफ, जंगली ससे कांगारू आणि हो गाई-म्हशी पण पाहिल्या. Bisons पाहिले- अतिशय अजस्त्र आणि मळकट प्राणी. त्याची कातडी म्हणजे जणू काही लक्तरे अंगावर चढवली आहेत अशी होती. हरणाच्या मोठमोठ्या प्रजाती पहिल्या. काळवीट, सांबार देखील होते. त्यांची शिंगे एकदम टोकदार व पाठीमागे अर्धगोलाकार आकारात होती. पाण्याच्या एका बाजूने काचा असलेला तलाव पाहिला त्यामध्ये पेंग्विन सफाईने पोहत होते.

Sea lion training
Bison

Otters पाहिले. Otter हा अतिशय लोभस दिसणारा आणि जमिनीवर राहणारा प्राणी आहे. Otters हे मांसाहारी असून त्याची शेपटी तो स्वसंरक्षणासाठी वापरतो. त्याच्या शरीराएवढी त्याची शेपटी असते. Otter हा डायव्हिंग स्पेशालिस्ट आहे. तसेच त्याला स्वच्छ पाणी आवडते. हा प्राणी साउथ अमेरिका आणि मेक्सिको येथे सापडतो. हा अतिशय बुद्धिमान प्राणी असून काहीजण त्याला पाळतात देखील! कलरफुल फ्लेमिंगोs पहिले- जणू काही त्यांची शेपटी रंगवली आहे असे वाटत होते. अजस्त्र आणि अवाढव्य शहामृग पाहिला. बापरे, केवढा मोठा होता तो!! पांडा गार्डनमध्ये आमची निराशा झाली. जेमतेम दोनच पांडा दिसले आम्हाला. आणि गर्दी बघितल्यावर ते लगेचच त्यांच्या गुहेत शिरले. अतिशय बुद्धिमान असलेले गोरिला, चिंपँझी पहिले. त्यांना कसरतीसाठी झाडाला झोपाळे तयार करून बांधले होते. एका चिंपँझी नंतर त्याला झोपण्यासाठी आमच्या समोरचे पोते अंथरून त्यावर झोपला. सर्व Zoo फिरून झाल्यावर असे लक्षात आले की प्रत्येक प्राण्याची उत्तम प्रकारे वर्गवारी करून त्यांना जास्तीत जास्त homely atmosphere मिळेल याची दक्षता घेतली आहे. सगळीकडे प्राणी आणि प्रेक्षक दोघांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. तसेच इतके प्राणी पाहिले की त्यातले अर्धे प्राणी आपण ओळखतच नाही! वेळ नसल्याने आमचे एक्वेरियम बघायचे राहिले.

Panda
Ostrich
Otter

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply