Budapest, Hungary

17 May

Mapवर Hungary देश

एकूण चार मोठ्या ट्रिप्सपैकी ही शेवटची “by air” ट्रिप. आम्ही हंगेरी देशातल्या बुडापेस्टला चाललो होतो आमचे विमान सकाळी अकरा वाजताचे होते आणि Potsdam ते Berlin एअरपोर्टची डायरेक्ट ट्रेन 8:05ची होती. ती बरोबर साडेआठला एअरपोर्टवर पोचणार होती. आम्ही घरून 07:40ला निघालो आमच्याबरोबर मितालीचा ग्रुप मधला मित्र दीप पण होता. तो युनिव्हर्सिटी मध्ये जाणार होता. तर त्याने सांगितले, “अरे तुमची एअरपोर्टची ट्रेन रद्द केली आहे!” मग आम्ही दोन ट्रेन बदलून 9:30ला विमानतळावर पोचलो. त्यादिवशी चेक-इन साठी खूप गर्दी होती त्यामुळे आमचे सेक्युरिटी चेकिंग झाले जेमतेम आणि आमच्या विमानाचा फायनल कॉल अनाउन्स करत होते. आम्ही धावत पळत लाऊंजमध्ये पोचलो. आमचे तिकीट व पासपोर्टचे चेकिंग झाल्यावर आम्ही lounge मध्ये विमानाची वाट पाहत उभे राहिलो. पण त्या दिवशी विमान अर्धा तास लेट होते. साडेअकराला विमानाने टेक ऑफ करून आकाशात भरारी घेतली.

आम्ही बुडापेस्टला उतरलो तेव्हा 12:45 झाले होते. एअरपोर्टवरून बस घेऊन हॉस्टेलसाठी निघालो. हॉस्टेलला जाण्याआधी आम्ही सिटी सेंटरला उतरलो कारण आम्हाला करन्सी exchange करायची होती. करन्सी एक्स्चेंज सेंटर एअरपोर्टला पण असते पण तिथे नेहमी कमी रेट देतात. आम्ही एक्सचेंज सेंटर शोधत होतो तेवढ्यात अचानक समोर आम्हाला कँडी स्टोअर दिसले. आम्हाला खूप आनंद झाला! आम्ही प्रागला गेलो होतो तिथे खूप candy स्टोअर्स बघितले होते पण इथे सुद्धा हे स्टोअर्स असतील याची कल्पना पण केली नव्हती. मात्र नुसते नेत्रसुख घेऊन आम्ही बाहेर पडलो कारण आमच्याकडे तिकडची करन्सी नव्हती. काही पावले चालल्यावर आम्हाला करन्सी एक्स्चेंज सेंटर मिळाले. Forint हे हंगेरी देशाचे चलन. एक युरो म्हणजे 375 Forints. त्यामुळे काही eurosच्या बदल्यात आम्हाला वीस हजार, दहा हजार, पाच हजार Forintsच्या नोटा व 200, 100, 50 असे कॉइंस मिळाले. मी तर अगदी हुरळून गेले होते की खूप पैसे आहेत आपल्याकडे! नंतर मात्र खर्च करताना समजले की तिकडच्या किमती पण त्याच रेंजमध्ये असतात- काहीशे आणि काही हजाराच्या घरात.

आम्ही होस्टेलला चेक-इन केले. या होस्टेलचे नाव अव्हेन्यू होस्टेल. या होस्टेलची इमारती हेरिटेज वास्तू असल्याने प्रॉपर रेनोवेशन करता येत नाही. त्यामुळे मूळ बांधकामाला धक्का न लावता बऱ्याच सोयी केल्या होत्या. इथले जिने गोलाकार व लाकडी होते. तसेच लिफ्ट तर पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुनी होती. लिफ्टचे बाहेरचे दार सिंगल होते व ते आपोआप बंद व्हायचे. आत शिरताना कपाटासारखी दोन लाकडी दारे होती. ती मात्र हाताने बंद करायला लागायची. लिफ्टच्या landing आणि take-offच्या वेळी दोन्ही वेळा जोरदार हादरे बसायचे. आम्ही मात्र लिफ्टवर पूर्ण विश्वास ठेवून ये-जा करायचो आणि लिफ्टनेसुद्धा तिच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. दुपारच्या जेवणासाठी आम्ही Upma रेडीमिक्स करून आणले होते. पोटभर उपमा खाऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो.

हादरे देणारी Lift

Margaret island

इथे एक छोटेसे बेट आहे- मार्गरेट आयलँड या नावाचे. या बेटाची लांबी 2.5 km व रुंदी 500 m असेल. या बेटावर जाण्याचा रस्ता पुलावरून होता. पुलावरून पायर्‍या उतरल्या की आपण बेटावरच उतरतो. मधून नदी वाहत असून त्यामुळे शहरात दोन भाग झाले आहेत आणि नदीच्या मध्ये हे मार्गरेट बेट तयार झाले आहे. बेट जरी लहान असले तरी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध होते बेटावर.

Garden at Margaret island, Budapest

पुढे वाचा…

Hostelमधली मंडळी

आज आम्हाला पूर्ण दिवस भटकायचे होते म्हणून सकाळी 8:15ला तयार होऊन पहिल्या मजल्यावर ब्रेकफास्ट रूम मध्ये गेलो. पाहतो तो काय, ब्रेकफास्टसाठी Full-on गर्दी! नाश्त्यासाठी ब्रेड, बटर, दोन प्रकारचे जाम, उकडलेली अंडी, cornflakes, दोन प्रकारचे ज्यूस, सफरचंद असं होते. आम्ही अंडी, ब्रेड, बटर आणि कॉफी असे घेऊन टेबल वर बसलो. आमच्या टेबलच्या समोरच्या बाजूला तिघेजण बसले होते. आशियाई वाटत होते. त्या तिघांपैकी एक जण आपल्या पूर्वीच्या हिंदी सिनेमातला Don दिसत होता.

पुढे वाचा…

Gyermekvasút

मग आम्ही tramने निघालो. नंतर नंतर tram अगदी जंगलासारख्या भागातून आणि वर जात होती. मला लक्षात येत नव्हते आपण कुठे चाललोय. मितालीला विचारले पण ती सांगेना. तिने माझ्यासाठी सरप्राईज ट्रिप ठरवली होती. Tramच्या शेवटच्या स्टॉपला आम्ही उतरलो. Tram आता बऱ्यापैकी उंचावर आली होती. समोरच पंचवीस-तीस पायऱ्या होत्या, त्या चढून आम्ही वर गेलो तर तिथे समोरच आम्हाला दहा-बारा वर्षांची मुले railway guardsच्या गणवेशात दिसली व आपल्या माथेरानसारखी पिटुकली ट्रेन दिसली! त्या ट्रेनचा खालचा अर्धा भाग लोखंडी पट्ट्यांनी बांधला होता म्हणजे त्या पट्ट्यातून हवा जात-येत होती. वरचा अर्धा भाग उघडा होता- फक्त खिडकीच्या फ्रेम्स होत्या. वरती छत होते.

पुढे वाचा…

Buda castle & Fisherman’s Bastion

आम्ही सोळा नंबरच्या बसने राजवाड्याला जायचे ठरवले. बराच वेळ आम्हाला सोळा नंबरचा बस स्टॉप सापडेना. मग आम्ही एका पोलीसला विचारले. आम्ही bus stopवर पोचलो. आमच्याबरोबर एक निग्रो मुलगीपण होती. तिने तीन दिवसांची टूर बुक केली होती. त्यामुळे तिचा टूरचा ग्रुप दिसल्यावर ती राजवाड्याच्या आधीच उतरली. राजवाड्यात आल्यावर आम्ही उतरलो तिथे बुकिंग ऑफिस होते. आतमध्ये गेल्यावर चौकशी केल्यावर कळले की राजवाडा, आर्ट गॅलरी व म्युझियम या सर्वांचे मिळून प्रत्येकी 4000 forint (10 euro) तिकीट होते!

पुढे वाचा…

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply