Museum Day (3 April)

आज आमचा म्युझियम डे आहे. Berlinमध्ये बरीच म्युझियम्स आहेत. मितालीने त्यातील पाच सिलेक्ट केली. मितालीने निघतानाच युनिव्हर्सल पास काढला. युनिव्हर्सल पास म्हणजे तुम्ही ट्रेन, बस, tram याने त्या 24 तासात कितीही प्रवास करू शकता.

प्रथम आम्ही नॅचरल हिस्ट्री म्युझियम ला गेलो. तिथे गेल्या गेल्या अतिप्रचंड Tyrannosaurusचा सांगाडा दृष्टीस पडला जवळजवळ दोन मजली उंच सांगाडा होता!

अजून त्यापेक्षा थोडे उंचीने कमी असे अजून तीन सांगाडे तिकडे होते. उंचीला कमी सगळ्यात लहान जो सांगाडा, तो पण जवळजवळ नऊ ते दहा फूट उंच होता. पुढे गेल्यानंतर पूर्ण जगभरात पडलेल्या उल्का होत्या. इथल्या विवेचनानुसार अगदी दहा किलोमीटरपेक्षा मोठ्या उल्का होत्या. त्या काळात जे Tyrannosaurusसारखे अजस्त्र प्राणी होते, त्यांच्या नष्ट होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण उल्कापात हे होते. उल्का पडताना ती तिच्या आकारापेक्षा कित्येक पट मोठा खड्डा तयार करते. त्यांचे वजन तर कितीतरी हजार किलोग्रॅम असायचे. त्यानंतर आम्ही अनेक प्रकारच्या सापांचे, फुलपाखरांचे आणि पक्षांचे models पाहिले- अगदी खऱ्यासारखे दिसणारे. रकुन, पांडा, साऊथ आफ्रिकेमधला मधला वाघ, मोर, झेब्रा, खेचर, सिंह, अनेक प्रकारची माकडे, खार, ससे, लांडगा, कोल्हा, अजगर सगळ्यात मोठी पाल, इत्यादी इत्यादी. अनेक युरोपियनs त्यांच्या लहान मुलांना हे सर्व दाखवून त्याप्रमाणे समजावून सांगत होते व ती मुले पण बोट उंचावून पालकांना प्रश्न विचारत होती. अगदी कुठेही जगाच्या पाठीवर गेलो तरी हमखास दिसणारे दृश्य.

नंतरच्या एका रूम मध्ये मितालीच्या ॲस्ट्रोफिजिक्सबद्दल बेसिक माहिती होती. सूर्य, त्याचे सूर्यमालेतील ग्रह, त्यांचे सूर्यापासूनचे अंतर, स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ, सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ आणि हायेस्ट टेम्परेचर, डेन्सिटी इत्यादी. त्याच रूम मध्ये अनेक एलिमेंट्स (जे स्टारमध्ये बनतात) बघायला मिळाले जसे की जस्त, अलुमीनीयम, copper, गोल्ड, bismuth, graphite, डायमंड इत्यादी इत्यादी. आणि स्टारचे आयुष्य संपले की त्यांच्या स्फोटानंतर अवकाशात पसरले जातात. अवकाशातून एखादा धूमकेतू पृथ्वीवर आला तर बरोबर हे एलिमेंट्स घेऊन येतो त्यामुळे उल्कापातामुळे आपल्याला जे पृथ्वीवर तयार होत नाहीत असे अनेक एलिमेंट्स देखील मिळतात .

एका रूम मध्ये मोठ्या बाटल्यांमध्ये मोठे मोठे मासे, मोठे साप, अजगर, मगर असे प्राणी त्यांच्या मुळ रूपात जतन केले होते. त्यांची संख्या शेकडोंच्या घरात असावी. छोट्या बाटल्यांमध्ये अनेक छोटे साप, बेडूक, स्टारफिश, jellyfish, octopus, मासे असे अनेक जलचर देखील होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शेवाळे देखील होते. दुसऱ्या रूममध्ये वेगवेगळ्या रंगाचे मकाव पक्षी होते. इतके रंगीबेरंगी आणि खरे वाटणारे. एका रूम मध्ये मोठा कलरफुल globe होता व तो पूर्ण युनिव्हर्स आहे अशी कल्पना करून त्याचे vertical डिसेक्शन करून, 1/4th part बाजूला काढून, आतल्या भागाचे वर्णन करून पृथ्वीचा आतला थर किती हजार किलोमीटर खोल आहे ते सांगितले होते.

बाजूला एका पॅनलवर हाताचा पंजाचे रेखाटन होते. त्यावर पंजा त्याप्रमाणे अलाईन करून किंवा ठेवून तिथे एका स्पीकरला कान लावल्यावर खोल गुहेतून काहीतरी उकळते रसायन वाहत असावे असा आवाज येतो आणि पृथ्वीच्या अथांगतेचा अनुभव येतो.

त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडून आम्ही ज्युईश म्युझियमला गेलो. या म्युझिअममध्ये अनेक मोठ्या मोठ्या ज्यू लोकांची पेंटिंग्स, पोस्टर्स, फोटोज व त्यांचे साहित्य होते. हिटलरच्या काळात ज्यू लोकांविषयी अनेक गैरसमज पसरले होते. ते नाहीसे करण्यासाठी जगभरात ज्यू लोकांनी अशी अनेक म्युझियम्स उभारली, जेणेकरून त्यांच्याबद्दलचे लोकांचे गैरसमज नाहीसे होऊन त्यांना कोणी वेगळे पडणार नाही. या ठिकाणी त्यांची हिब्रू भाषा तसेच त्यांच्या चालीरिती, त्यांचा धर्म ग्रंथ (Torah) तोराह या सर्वांची ओळख करून दिली आहे. तिथे तुम्ही तुमचे नाव लिहून हिब्रू भाषेत ट्रान्सलेट करू शकता. आम्ही दोघांनी आमचे नाव लिहिले. त्यानंतर एका सेक्शनमध्ये आपल्याकडे जसे ध्यानमंदिर असते तसे होते. आपल्याकडे जसे मंदिरात किर्तन सुरू असते तसेच दुसर्‍या सेक्शनमध्ये होते. पूर्ण परिसरात chanting सुरू होते. दुसरीकडे झाडाची पाने असतात त्या आकाराची कागदाची पाने आणि पेन ठेवला होता. तुम्ही तुमच्या मनातील इच्छा त्यावर लिहून त्या झाडाला ते लिहिलेले पान अडकवू शकता. या म्युझियमची विभागणी तीन axes मध्ये केलेली आहे- Axis of Continuity, Axis of Holocaust and Garden of Exile.

Jewish museum

Axis of Continuityमध्ये प्रत्येक दहा पायऱ्यानंतर एक दरवाजा असे सलग एकातून दुसरे असे दालन समोर येतात. प्रथम दृष्टीस पडतात उंच उंच पायऱ्या. दहा पायऱ्या नंतर एक छोटासा passage आणि डाव्या हाताला एक दरवाजा. तिथे आतमध्ये गेलो की प्रसिद्ध ज्यू लोकांची ज्यू लोकांनी काढलेली पेंटिंगs, उदा. आईन्स्टाईन, Karl Marx, सिग्मंड फ्रॉइड. परत दहा पायऱ्या चढून गेले की दुसरा दरवाजा. त्याच्यामध्ये ज्यू लोकांचे धार्मिक आणि इतर साहित्य. तिसरा दरवाजामध्ये पूर्वी होऊन गेलेले jewish राजे-राण्या, त्यांचे फोटो, त्यांच्या अनमोल वस्तू, मुकुट, दिवे, अंगठ्या, नेकलेस, सिंहासन इत्यादी. चौथा दरवाजा- या रूममध्ये शिरले की तिथे छोटे छोटे सोफे, त्यावर जोडलेले हेडफोन्स आणि समोर छोटे screens, त्यावर सतत काही ना काही तरी चालू होते. उदा. jew लोकांचे पिक्चर, हिटलरच्या वेळचे प्रसंग छोट्या-छोट्या क्लिप्स मधून. त्याच्या बाजूच्या दालनात jew लोकांचा पवित्र धर्मग्रंथ, तोरा, काचेच्या पार्टिशन मध्ये ठेवला होता. पूर्वीच्या काळी जसे खलिते असतात तसे त्याचे स्वरूप होते. तिथे हिब्रू भाषेत chanting सुरू होते. शेवटचा दरवाजा तळमजल्यावर आहे. तिथे एका कलाकाराने, Hitlerने jew लोकांचे शिरकाण केले त्यांचे चेहरे त्यांच्या आठवणीत बनवले आहेत. हे अनामिक चेहरे जड धातू ने बनवले आहेत. तुम्ही त्यावरून चालत गेलात की कोणीतरी वेदनेने कण्हण्याचा आवाज येत नसला तरी तशीच दुःखद जाणीव होते. असे अगणित चेहरे आहेत.

Axis of Holocaustमध्ये हिटलरने उघडलेल्या यातना तळातील खोलीचा अनुभव आणून देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये 24 मीटर उंच व निमुळत्या होत गेलेल्या भिंती, तसेच क्लायमेट कंट्रोल नसल्यामुळे हाडे गोठवणारी थंडी, उजेडासाठी एकदम उंच एक छोटीशी झडप ज्यातून थोडासा उजेड झिरपतो. या खोलीतील शांतता अंगावर येते आणि त्यावेळी अशा खोल्यांमध्ये jew लोकांना कैदी म्हणून कोंबल्यावर त्यांचे मानसिक खच्चिकरण व्हायला अजिबात वेळ लागत नसेल.

तिसरे दालन, Garden of Exile. हे असे दालन आहे जे अस्थिरतेने पुरेपूर भरलेले आहे. तिथे आजूबाजूला Greek ऑलिव्हची झाडे आहे. तुम्ही यात प्रवेश केल्यावरच तुम्हाला तुमचा तोल सावरता येत नाही, कारण तिथल्या जमिनीवरील रेघांचा कोन विषम आहे. त्यावर उभे असलेले एकुणपन्नास कॉलम्स, उंच-सखल जागेवर उभे आहेत. जमिनीवर जे दगड बसवले आहेत ते पण खडबडीत आहेत. या सगळ्यात त्यांना दिलासा म्हणजे उन्हाळ्यात झाडे त्यांना सावली देतात. यात exile म्हणजे सुटका आणि सुरक्षितता, पण त्याचबरोबर अनिश्चितता. निर्वासित जे दुसऱ्या देशात आसरा घेतात त्यांना पावलोपावली अनुभव देणाऱ्या अस्थिरतेचे हे प्रतीक आहे. हे सर्व बघून झाल्यावर मन एकदम सुन्न होऊन जाते. एखादा हिटलर, पण अख्ख्या jew जमातीची अशी वाट लावून टाकतो की अजून ते लोक स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यासाठी त्यांना स्वतःच्या संस्कृतीची, धर्माची माहिती, सर्वांना कळावी म्हणून museums उघडावे लागतात.

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply