16 March
जर्मन लोकांबद्दल माझे निरीक्षण असे की मुद्दाम बोलायला येणार नाहीत पण मदत मागितल्यास तत्परतेने मदतीला येतील. तसेच ते जास्त बोलत नाहीत कारण खूप चांगले इंग्लिश बहुतेक कोणालाच येत नाही. त्यामुळे ते non-जर्मन माणसांशी बोलताना कम्फर्टेबल नसतात. जर्मन माणूस हा फॅमिली man आहे. तो त्याच्या घराच्या आजूबाजूच्या एरियामध्ये मुलांसाठी वॉच टॉवर, घसरगुंड्या, झोपाळे तयार करून मुलांची इंटरटेनमेंटची हौस पुरवतो. तसेच त्यांच्याकडे लहान बाळ एक तर बाबागाडीत बसते, नाहीतर त्याची स्वतःची छोटी bicycle असते. त्यावर तो आई-बाबांच्याबरोबर सायकलींग करून रोड क्रॉस करणे, सायकल चालवणे असं करतो. त्यामुळे खूप लहानपणापासून ट्रॅफिक सेन्स डेव्हलप होतो.


तसेच इथे बरेच लोक फिटनेसचे चाहते आहेत. carsचे प्रमाण त्या मानाने कमी आहे. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. तसेच ट्रेनमध्ये बरेच जण पुस्तक वाचताना दिसतात, नाही तर गप्पा मारताना दिसतात. मोबाईलचे प्रमाण साधारण पंचवीस ते तीस टक्के आहे. आपल्याकडे ट्रेन किंवा बसमध्ये मोबाईलचे प्रमाण 85-90 टक्क्यांच्या वर असते. फिटनेसची आवड असल्याने इथे जंगलांमध्ये पायवाट असते. तिथे तुम्ही फॉरेस्ट ट्रेकचा अनुभव घेऊ शकता. आणि हो, जरी जंगलामध्ये पायवाट असली तर इथे एक सुद्धा सरपटणारा प्राणी किंवा अजून कुठल्या प्रकारचा प्राणी आढळत नाही. कारण त्यांना आधीच दुसऱ्या कुठल्या तरी दाट जंगलात relocate केलेले असते. यामुळे त्या प्राण्यांची सुद्धा चांगली सोय होते, तसेच माणसांसाठीसुद्धा या फॉरेस्ट ट्रेक अत्यंत safe होतात.



इथली घरे, त्यांना Villas म्हणतात, म्हणजे आपले बंगले. टुमदार, कौलारू, आजूबाजूला बाग, बागेत मुलांसाठी खेळण्याचे विविध प्रकार- उदा. टायरचा झोपाळा, घसरगुंडी, watchtower; त्याला चढायला एका बाजूने शिडी, दुसऱ्या बाजूने ट्रेक करतानाचा अनुभव. इथे मोठ-मोठी शेते आहेत. इथे घोड्यांचे तबेले पण दिसतात. शेळीपालन, कुक्कुटपालन, मेंढीपालन, egg फार्मिंग असे बरेच व्यवसाय आहेत. इथल्या मूळचा जर्मन खूप शिस्तप्रिय आणि कामसु आहे. कडाक्याच्या थंडीत देखील टी-शर्ट आणि shorts घालून सायकल चालवणारे अनेक महाभाग दृष्टीस पडतात.






इथे युनिव्हर्सिटीच्या आसपास आणि Berlin सारख्या शहरात अपार्टमेंट असतात. त्याला स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात. स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये एकच Room, self-contained असते. त्यात working टेबल, bed, wardrobe आणि kitchen युनिट- त्यामध्ये इंडक्शन, microwave, रेफ्रिजरेटर आणि storage असे असते. दरवाजातून आत आल्यावर WC plus बाथरूम असे सर्व असते. त्यात काचेचे फोल्डिंग डोअर्स असलेले बाथरूम, washbasin आणि mirror असे सर्व असते. Shared apartments म्हणजे 4 बेडरूम, कॉमन हॉल आणि किचन आणि दोन कॉमन बाथरूम आणि WC. एकंदरीत बाहेरून आलेले मुले आणि मुली इथे बऱ्यापैकी adjust होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे खूप सुरक्षितता आहे. रात्री किंवा दिवसा सुनसान जागी तुम्ही एकटे असलात तरी अजिबात भीती नाही. हा मोठा प्लस पॉइंट आहे.
आज आम्ही दोघीही सायकलिंग करणार आहोत. आम्ही साधारण दुपारी साडेतीन वाजता निघालो आणि दोन सायकल घेऊन जवळजवळ दोन अडीच तास भटकलो. मागच्या वेळी भेटलेला जॉनी आम्हाला परत भेटला. आम्ही तिथे पाच मिनिटे बेंच वर बसलो. तो बंगल्याच्या मागच्या बाजूला ऊन खात पेंगत होता. आम्ही बोलवल्यावर 1-2 सेकंद त्याला कळलेच नाही व नंतर बहुदा ओळख पटली असावी. लगेच उठून गेटच्या मधून बाहेर आला. आम्हाला तर खूपच आनंद झाला होता जणू Ranchoला भेटण्याची भूक आम्ही त्याच्यावर भागवत होतो. त्याला पण जणू कळले असावे. तो आमच्याकडून खूप लाड करून घेतो.



इथे सायकलींसाठी खूप मोठे आणि सरळ रस्ते आहेत. सायकल चालवण्यातली खरी मजा येते. जर रस्ता छोटा असेल तर मागची गाडी सायकलस्वाराला ओव्हरटेक करून पुढे जात नाही. अशा वेळी खूप स्पेशल असल्याचा फील येतो. तसेच इथे अजून एक गंमत म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्याची गाडी पुढे असेल तर त्याच्या मागच्या सर्व गाड्या horns वाजवतात. Way to congratulate them! एरवी no horns! मग सुमारे दोन ते अडीच तास सायकल चालवल्यावर आम्ही घरी आलो.
Russia-Ukraine युद्धाचे परिणाम
आज 28 March. रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाची कमतरता आहे. येथे गेल्या आठवड्यापासून तेलाचा section रिकामाच आहे. दुसऱ्या section मध्ये तर्हेतर्हेची oils आहेत. उदा. olive oil, फ्लॅक्ससीड oil, pumpkin सीड oil, sesame oil. एक तर ही तेले खूप महाग आणि त्याचा उत्कलन बिंदू माहित नाही. कारण आपल्या जेवणाला फोडणीसाठी तेल चांगले गरम व्हायला लागते. त्यामुळे सध्या बटर आणि फोडणीसाठी तुपाचा वापर चालू आहे.
आज संध्याकाळी आम्ही इथले Döner (डोनर) खाल्ले. यामध्ये भरपूर salad असून एका बाजूला फ्रेंच फ्राईज आणि फलाफलचे पिसेस (छोले भिजवून वाटून त्यात मसाले घालून तळले जातात). ही Turkish dish आहे. तुर्की लोक पण आपल्या सारखेच चमचमीत खाणारे आहेत. त्यांच्या जेवणात भरपूर मसाले असतात पण तिखट नसते. ते लोक पण आपल्यासारखेच खूप गोड खातात. टर्किश चहा फेमस आहे. त्यांच्या चहात साखर भरपूर असते पण दूध अजिबात नाही. मी तसा चहा अजून घेतला नाही. वेटिंग फॉर new एक्सपिरिमेंट! माहित नाही Mitali अजून काय काय खायला घालते. पण जे काय खायला घालते ते सर्व मला आवडते कारण तिच्या आणि माझ्या आवडी खूप सारख्या आहेत. आणि हा, इथे खाद्यतेल Ukraine मधून इम्पोर्ट करतात त्यामुळे माहित नाही कधी टंचाई दूर होईल.









Leave a Reply