Johnnyची भेट (22 March)

आज आम्ही कॅन्टीनला (Mensaला) जेवायला गेलो. जेवण्यासाठी एक मेक्सिकन व्हेज बर्गर आणि मेक्सिकन डिश चिली विथ बीन्स घेतली होती. जेवणानंतर मिताली तिच्या युनिव्हर्सिटीत कामासाठी गेली आणि मी सायकल चालवायला.

संध्याकाळी युनिव्हर्सिटीच्या रस्त्याने पुढे चालत चालत एका छोट्याशा टेकडीवर गेलो. जातांना मोकळे रस्ते आणि मोकळा श्वास- सुंदर मिलाप! इथे अगदी आतले रस्ते पण व्यवस्थित आखीव आणि रेखीव. प्रत्येक रस्त्यावर झाडांना प्रोटेक्टर आणि पार्किंग प्लेस फक्त आतल्या आणि मेन रोड वर फरक एवढाच की तिथे सायकल ट्रॅक नसतात. तिथे एका बाजूने सॉफ्ट चढाव असून मग वरती सनसेट पॉईंट आहे. टेकडीला प्रदक्षिणा घालून तोच रस्ता खाली उतरत येतो. तिथे झाडांना पाने नाहीत पण नुसती छोटी-छोटी रंगीबेरंगी फुले. खूप सुंदर आणि मनमोहक दिसतात. सनसेट व्हायला तासभर असल्याने आम्ही परत घरी परत निघालो. वाटेत तिथे एका बाकावर बसलो होतो. तिथे आजूबाजूला सुंदर सुंदर बंगले आणि गार्डन. चालत चालत बोलत असताना माझ्या तोंडून पटकन निघून गेले की इथे काही वर्षांनी मिताली तुझा पण बंगला असेल. आईचे आशीर्वाद वाया जात नाही. तिचा बंगला बघायला मी असेल नसेल पण मधू, युवराज व चारू नक्कीच असतील. युवराज मिताली मावशीच्या बंगल्यात त्याची सुट्टी घालवेल.

बाकावर बसलेले असताना तिथून एक ग्रे कलरचा बोका, मागच्या बंगल्यातून चालत चालत आमच्या दिशेने आला. वाहवाह! काय ते डौलदार चालणे! आम्ही बघतच राहिलो तर तो आमच्या पायाशी येऊन बसला. आम्ही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ते त्याला खूपच आवडले. जवळजवळ पाच ते दहा मिनिटे आमच्याकडून लाड करून घेत होता. त्याला बघून Ranchoची खूप आठवण झाली. आम्ही त्याचे नाव जॉनी ठेवले. अशा रीतीने अत्यंत आनंदात दिवस संपला आणि आम्ही घरी परत आलो.

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply