प्रस्तावना

नमस्कार मंडळी, खरेतर आजकाल युरोपचा प्रवास करणे ही काही विशेष गोष्ट नाही अगदी सामान्य झाले आहे सध्याच्या काळात. पण माझ्यासाठी मात्र ही गोष्ट खूप खास, अगदी मर्मबंधातली ठेव आहे. माझा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास. त्यातून शिकत असताना मिळालेल्या स्टायपेंड मधून स्वतःचा खर्च करून तसेच दरमहा काही ठराविक रक्कम माझ्यासाठी पाठवुन मितालीने माझी सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर अगदी समर्थपणे पेलली आहे. आणि मला तिचा खूप खूप अभिमान आहे. परदेशात राहून मिताली माझ्याप्रती तिचे सर्व कर्तव्य पार पाडते तर इतर वेळी हा आधार मला मधु आणि चारूकडून मिळतो.

कृतज्ञता

मिताली माझी दोन नंबरची मुलगी; पहिल्यापासून ॲस्ट्रॉनॉमीची तिला प्रचंड आवड. तिला Masters in Astrophysics या कोर्समध्ये University of Potsdam, जर्मनी इथे ऍडमिशन मिळाली. मितालीला जर्मनीला जाण्यासाठी मुख्यतः हातभार लागला तो दोन गोष्टींचा- मकरंदच्या पॉलिसीचे पैसे व माझ्या आई-बाबांच्या पश्चात मिळालेले पैसे. या सर्वांचा मला खूप उपयोग झाला. मितालीला आता जर्मनीत जाऊन चार वर्षे झाली, तो सर्व काळ, तसेच मकरंद (माझे यजमान) गेल्यानंतरच्या काळात माझी सर्व जबाबदारी मधु आणि चारूने अगदी लीलया सांभाळली. माझी मोठी मुलगी मधुश्री आणि तिचे यजमान चारूदत्त कोलारकर. त्यांचा मुलगा युवराज (वय वर्ष 9) – माझा नातू. मधु व चारू दोघांनी युवराज च्या जडण-घडणीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. याव्यतिरिक्त त्या दोघांनी, अजून काही हितचिंतकांच्या मदतीने, माऊली ग्रुप ऑफ डोंबिवली या एका नॉन प्रॉफिट संस्थेची स्थापना ही केली आहे. या संस्थेच्या साहाय्याने ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासाचे सामान तसेच त्यांना शिकणे सोयीस्कर व्हावे म्हणून त्यांच्या शाळेत स्मार्ट टीव्हीs सुद्धा अरेंज करतात. यामध्ये मधूच्या सासू-सासरे या दोघांनीही मला आपले मानले. कधीच परकेपणा जाणवू दिला नाही. मकरंद गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरायला मला मदत झाली ती युवराजची. युवराजचे निरपेक्ष प्रेम मला नवीन उमेद देऊन गेले. त्याचे माझ्यावरचे प्रेम म्हणजे माझ्यासाठी शिंपल्यातला अनमोल मोती आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते.

असो. या सर्व प्रवासात अजूनही माझे जिवलग आणि हितचिंतक आहेतच. त्यामध्ये मी नाव घेईन ते माझ्या सख्या बहिण भावंडांचे (सीमु, रवी, अनिल, संध्या, मनिषा, सुहास) व माझ्या नणंद आणि तिच्या यजमानांचे (दीपा वन्स आणि रवींद्र राव). काही मैत्रिणी पण आहेत त्यात प्रामुख्याने मी उल्लेख करीन ते मंजू, सुहासिनी, नीता, हेमा, डॉक्टर भारती आणि जरी मी नाव घेतले नाही तरी सर्व मामे, मावस, चुलत आणि आते भावंडे आहेतच त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी मी ठरवले होते की मी माझे तिकडचे अनुभव शब्दबद्ध करेन कारण जसजसा वेळ जाईल तशा त्या आठवणी धूसर होतात. अजून पाच वर्षांनी जेव्हा मी माझी डायरी वाचेन तेव्हा या सर्व आठवणी ताज्या होतील आणि हो, डायरी साठी इन्स्पिरेशन चारूकडून मिळाले. त्याने युवराजच्या अगदी लहानपणापासूनच्या गोल्डन मोमेंट्स लिहून आणि फोटो रूपात साठवल्या आहेत. त्याच्या मताप्रमाणे युवराज मोठा होईल तेव्हा त्याला खूप मजा येईल ते सर्व वाचताना आणि फोटो बघताना.

ही पहिली डायरी पण मला चारू-मधू ने दिली. मी आजपर्यंत अनेक डायर्‍या लिहिल्या त्या फक्त जमाखर्चासाठी आणि पाककृतीसाठी. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. सीमुने मला सुचवले की तू ब्लॉग लिही. मला ही आयडिया खूप भावली. माझे अनुभव इतरांसाठी कदाचित अगदीच सामान्य असतील पण माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहेत.

काही गोष्टी ज्या मी इथे (Germanyमध्ये) प्रथम पाहिल्या त्या आपल्या भारतात असतीलही पण माझ्या दृष्टीने नवल परीच आणि मनात आणले आणि ब्लॉग लिहायला घ्यायचे ठरवले तसे होत नाही ना कारण ब्लॉग हा माझ्यासाठी खूप नवीन आहे. या ब्लॉगसाठी मला मिताली, दीप, श्रेया आणि अंजली या सर्वांनी मदत केली. माझे ब्लॉगचे मेन-कॅप्शन दीपने सुचवले तसेच श्रेयाने सब-कॅप्शन सुचवले त्यामुळे मितालीच्या या सर्व गोड मित्र-मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते. या सर्वांबरोबर दिव्या आणि निश्चल हे जोडपे पण खूप छान आहे. लाघवी आहेत सगळी पोरे. मित्तलने मला खूप ठिकाणी हिंडवले पण या बाकी मुलांनीपण माझे जर्मनीतले दिवस खूप बहारदार बनवले.

माझा कोविडपूर्व visa रद्द झाला होता कारण कोरोना मुळे माझे विमान रद्द झाले होते. त्यामुळे प्रत्यक्ष विमानात बसेपर्यंत माझा विश्वास जरा डळमळीतच होता. एकदाचे सर्व सोपस्कार पार पडले आणि मी हुश्श केले एकदाचे. मी इथे Potsdam ला मितालीकडे आले आहे. Potsdam हे Berlin पासून ट्रेनने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मिताली विषयी सांगायचे म्हणजे ती युनिव्हर्सिटीमध्ये ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये कम्प्युटर सिमुलेशन या विषयावर डॉक्टरेट करते आहे. तिचे हे शेवटचे वर्ष आहे. ती एकटीच राहते. तिचे स्टुडिओ अपार्टमेंट आहे त्यामुळे माझी खूप छान सोय झाली आहे. तिची यूनिव्हर्सिटी घरापासून चालत सात-आठ मिनिटावर आहे.

मितालीच्या घरातून दिसणारा sunset

निघण्याआधीची उत्सुकता

हा प्रवास सुरु करतांना मी 5 मार्च पासून सुरुवात करेन , कारण हा सर्वच काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज मधुच्या सासरहून निघण्याचा दिवस. मी कालच रात्री मधुकडे राहण्यासाठी आले. मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. एकीकडे मितालीला भेटण्याची उत्सुकता व दुसरीकडे युवी आणि मधूला सोडून तीन महिने राहणार ही हुरहूर. युवराज जर एक आठवडाभर भेटला नाही तरी चुकल्यासारखे वाटते. आता तर तीन महिने प्रत्यक्ष भेटणार नाही! असो. खूप दिवसांनी भेटल्यावर प्रेम आणखीन वाढते.

चारूच्या आईने माझ्यासाठी काल वडापावची पार्टी केली होती. खूपच चवदार! जरा कंट्रोल करूनच खाल्ला मी. कारण चार-पाच दिवसापासून cough आणि खोकला झाला होता. खूप टेन्शन होते कारण एअरलाईन्सच्या साइटवर rt-pcr ची गरज नाही असे सांगितले होते पण प्रत्यक्षात काहीच सांगता येत नाही. कारण जर rt-pcr positive आली तर सगळाच घोटाळा आणि पैशाचा चुराडा.

पुढे वाचा…

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply