Covid vaccination appointment

आज माझा व्हॅक्सिनेशन डे. सकाळी नऊची अपॉइंटमेंट होती. माझे दोन व्हॅक्सिनेशन डोस आधीच इंडियामध्ये झालेले आहेत पण मी इथे तिसऱ्या डोससाठी एलिजिबल आहे म्हणून मितालीने सांगितले की तू व्हॅक्सिनेशन घेऊन टाक. त्याचा आणखीन एक फायदा असा की त्या नंतर युरोपमध्ये फिरतांना परत परत rt-pcr टेस्ट करण्याची गरज राहणार नाही.

Berlinचे व्हॅक्सिनेशन सेंटर तिथल्या जुना एअरपोर्टच्या जवळपास होता. बस स्टॉपपासून व्हॅक्सिनेशन सेंटरला जाण्यासाठी एक छोटी 12 सीटर बस होती. बरोबर नऊ वाजता आमच्या पुढील माणसाचे पेपर चेक केले गेले. लगेच माझा नंबर आला. Mitaliने सर्व पेपर दाखवले. माझा पासपोर्ट पाहिला व लगेच पुढे सोडले. तिथे एका जर्मन मुलीने माझा पासपोर्ट व पेपर स्कॅन करून दुसरा एक पेपर दिला. 50 ते 55 व्हॅक्सिनेशन booth होते. आम्ही 31 नंबरच्या boothमध्ये गेलो. तिथे एका जर्मन मुलाने आमचे सर्व पेपर सर्व पासपोर्ट घेऊन ते सर्व अपलोड केले. मग एक दुसरी मुलगी येऊन तिने नाव विचारले, तसेच language प्रेफरन्स विचारून मला विचारले की आधीच व्हॅक्सिनेशन कुठले होते? तसेच, आता मी तुम्हाला Biontech Pfizer देणार आहे.व्हॅक्सिन दिल्यानंतर आम्ही माझी कागदपत्र ताब्यात घेतली व observation एरियामध्ये 10-15 मिनिट बसलो. तिथून बाहेर पडताना आम्हाला फिजिकल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट व QR कोड प्रिंट करून दिला, जेणेकरून मला डिजिटल सर्टिफिकेट माझ्या फोनमध्ये डाउनलोड करता येईल. तिथून परत ती छोटीशी बस उभीच होती. जाताना तर दुसरे कोणीच नव्हते, आम्ही दोघीच अख्या बस मध्ये होतो. मग परतीच्या प्रवासासाठी आम्ही रिजनल ट्रेन घेतली. या ट्रेन प्रवासात विनातिकीट प्रवास केला तर त्यासाठी 60 यूरो असा घसघशीत दंड आहे. रुपयांमध्ये सांगायचं तर जवळ-जवळ पाच हजार रुपये!

घरी आल्यावर बायो वेस्ट टाकायला बाहेर गेलो. इथे प्रत्येक अपार्टमेंटच्या बाहेर एक मोठा पिंजरा असतो. त्यात मोठमोठे प्लास्टिक कंटेनर असतात. प्रत्येक डब्यावर नाव असते. त्यातच तो कचरा टाकायचा- पेपर वेस्ट, बायो वेस्ट (ओला कचरा), dry वेस्ट, दुधाचे पाउच, काचेच्या बाटल्या इ.

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply