व्हेरी हॅपी बर्थडे डिअर मिताली!! कितीतरी वर्षांनी बर्थडे तिच्या बरोबर राहून साजरा करणार आहे. सर्वप्रथम आम्ही बाहेर पडलो, पहिल्यांदाच rt-pcr टेस्ट केली; ती टेस्ट नेगेटिव आली. टेस्ट केली एवढ्यासाठी की मॉलमध्ये वगैरे गरजेचे आहे. प्रथम पोस्टात गेलो तिथे त्यांनी माझा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून माझी डिजिटल सिग्नेचर करून घेतली मग माझं सिमकार्ड तीन महिन्यांसाठी घेतले आहे ते ऍक्टिव्हेट झाले. आता मी इथल्या नंबरने कॉल करू शकते व इंटरनेट सुद्धा वापरू शकते.
यानंतर आम्ही Berlinला जायला निघालो. Potsdam आणि Berlin अगदी जवळ जवळ आहेत पण दोन्ही मधील कन्स्ट्रक्शन एकदम वेगळे. Potsdamमध्ये villasचे प्रमाण जास्त आहे त्या उलट Berlinमध्ये मोठ्या म्हणजे पाच-सहा मजली बिल्डिंग आहेत. रोड तसे काही खूप प्रशस्त आहेत असे नाही पण ट्राफिक जाम अजिबात नाही कारण रोडवर अजिबात पार्किंग नाही. रोडच्या बाजूला पार्किंग slots आहेत त्यामुळे ज्यांच्या घरी पार्किंग नसेल ते रोडवर जिथे पार्किंग slots आहे तिथे पार्किंग करू शकतात.

आम्ही जाताजाता जर्मन गव्हर्मेंटच्या buildings पाहिल्या- त्याला Reichstag असे म्हणतात. नंतर आम्ही Mehringdamm येथे गेलो तिथे फेमस फूड शॉप आहे- Mustafa’s Gemuese Doener. तिथे खूप मोठी लाईन होती. शनिवार असल्याने खूप गर्दी होती. आमच्यापुढे ऐंशी शंभर माणसे असावीत. साधारण पाऊण तासाने आमचा नंबर आला. आपल्याकडे जसे shawarma असतात तसे तो व्हेजिटेबल shawarma जॉइंट होता. आम्ही shawarma गरम-गरम खाल्ला, खूप एन्जॉय केला. नंतर बाजूच्या दुकानात आम्ही फ्रेंच फ्राईज घेतले. इथले फ्रेंच फ्राईज वेगळे असतात. आपल्याकडे फिंगर size चिप्स असतात. इकडे त्याच्या तीन पट जाडे असतात. गरम गरम fries व त्यावर टोमॅटो सॉस आणि mayonnaise. वा मस्त मजा आली!! नंतर आम्ही दोन वेळा अंडरग्राउंड ट्रेन बदलून बर्लिनचा फेमस टिव्ही टॉवरला आलो. हा टॉवर खूप उंच असून राउंड शेप भागात रेस्टॉरंट आहे.


मग आम्ही Primark या आपल्या बिगबजार सारख्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेलो. तिथे मितालीच्या वाढदिवशी दोन टी-शर्ट आणि एक पॅन्ट आणि सॉक्स अशी माझी खरेदी झाली. खूप फोटो काढले. त्याच squareमध्ये पार्क इन नावाच्या हॉटेल बिल्डिंगवर बंजी जंपिंगची सोय होती. 15-17 मजली इमारत असावी. शाहरुख खानचा डॉन 2 या पिक्चरचे शूटिंग तिकडे झाले आहे.


नंतर आम्ही कॅट कॅफेला भेट दिली. इथला concept असा की तिथे रेसिडेन्शिअल कॅट्स असतात; माणसांना बसण्यासाठी टेबल-खुर्ची असतात, तसेच मांजरांना बसण्यासाठी त्यांची घरं, ट्रे सारखे मोठे cushion tubs असतात. ज्यांना मांजरांची आवड आहे ते तिथे येऊन केक व कॉफीचा आस्वाद घेताना मांजरांशी खेळू शकतात. एकूणच सांगायचं झालं तर this place is a stress-buster!! तिथे आम्ही पहिल्यांदा Berry केक ट्राय करायला म्हणून मागवला पण तो खूपच आंबट होता. मितालीने पण पहिल्यांदाच ट्राय केला होता. मग त्यावर antidote म्हणून आम्ही चीजकेक मागवला. तिथून आम्ही एका इंडियन स्टोअरमध्ये गेलो. तिथे पोहे, कोथिंबीर, पनीर असे घेऊन बाहेर पडलो. अरे हो, दुधीभोपळा पण घेतला- आमच्या दोघांची आवडती भाजी!

मग तिथून आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन घरी पोचलो. Regional ट्रेन मध्ये बरेच Ukranian refugees दिसले. त्यामुळे सध्या या ट्रेनना खूप गर्दी असते. अत्यंत हताश आणि गोंधळलेल्या चेहऱ्याचे व बरोबर भरपूर बॅगा, पिशव्या घेऊन जर्मनीत आश्रयासाठी आलेले शरणार्थी. बहुतेक जणांना त्यांची युक्रेनियन भाषा सोडून दुसरी कोणतीच भाषा येत नाही पण दिसतात अगदी युरोपियनs सारखेच आणि युक्रेन युरोप मधली कंट्री असल्याने त्यांना visa लागत नाही. आपल्याकडे रेफ्युजी म्हणजे सिंधी लोकांचे उल्हासनगर मधल्या campsचीच अगदी आठवण झाली.









Leave a Reply