10 March
आदल्या दिवशीच्या पायपिटीने खूप थकलेलो. आज नाश्त्यासाठी उकडलेले अंडे, ब्रेड, चीज, आलू पराठे आणि चहा असा भरपेट नाश्ता खाऊन नंतर एक तासभराने बीटची कोशिंबीर खाऊन आम्ही मितालीच्या workplaceला म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये गेलो. तिथे मितालीला कामासाठी केबिन आहे. तिथे दुसरे कोणी नसल्याने मी पण तिच्याच बरोबर तिथे बसले.

जर्मनीमध्ये सायकलीचे प्रमाण खूप जास्त आहे आणि वयाच्या 14-15-16 ही वर्ष मी खूप सायकल चालवली आहे त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून मितालीच्या मागे लागले होते की मला पण सायकल चालवायची आहे. As a student, मितालीला रोज तीन तास सायकल राईड फ्री आहे. मला कितपत सायकल चालवता येईल याची शंका होती कारण एकतर चाळीस-पंचेचाळीस वर्षाचा gap आणि वजनातील भरभक्कम वाढ; तसेच इतकी वर्षे सायकल हातात धरली नसल्याने बॅलन्सिंग जमेल की नाही हे दडपण.
सायकल हातात घेतल्यावर समजले की आता परत पहिल्यापासून श्रीगणेशा! कारण बॅलन्स झिरो; एका पायाने पायडल मारण्याचा प्रयत्न केला पण तरीही जमेना. मग मितालीने आधार देऊन धडपडत कशीबशी चाळीस-पंचेचाळीस मिनिटे सायकल चालवली. पायडल मारताना जेव्हा दुसरा पाय पायडलवर ठेवायचा प्रयत्न करेपर्यंत बॅलेंसिंग बिघडायचे. कमरेत आणि पायात cramps यायचे. त्यामुळे दोन्ही पाय पायडलवर क्वचित असायचे. पायांची खूप वाट लागली पहिला दिवस असल्याने पण मजा आली. मी सायकल चालवत असताना आजूबाजूने बरेच जण ये-जा करत होते पण कोणीही बघत नव्हते किंवा लक्षपण देत नव्हते त्यामुळे कॉन्शस व्हायला झाले नाही. याचा मला खूप फायदा झाला. सायकल चालवून झाल्यावर आम्ही मितालीच्या केबिन मध्ये आलो. तिथे तिने तिचे काम केले .मग तिथून जवळच तिची gym आहे. ती दीड तास जिममध्ये गेली आणि मी तिच्या केबिन मध्ये मासिक वाचन, डायरी लिखाण यात वेळ घालवला. संध्याकाळी आम्ही बरोबर घरी गेलो. रात्री जेवणासाठी थालीपीठे बनवली.

मितालीचे फ्रेंड्स
तिच्या आत्तापर्यंतच्या जर्मनीच्या प्रवासात सुदैवाने तिला काही चांगले मित्र-मैत्रिणी भेटले आहेत. मी जर्मनीत असताना त्यापैकी काही जणांशी माझी ओळख झाली. अंजली (PhD student), दीप (Master student), दिव्या (Master student), निश्चल (दिव्याचा नवरा; full-time working employee at Tesla) आणि श्रेया (Master student)- हे सर्व इथेच Potsdam-बर्लिन मध्ये राहतात. इथे असल्याच्या काही दिवसात आणखी एका इंडियन फॅमिलीशी ओळख झाली. विद्या झेंडे, तिचे यजमान आणि त्यांची लहान मुलगी नायशा. विद्या व तिचे यजमान दोघेही PhD holders आहेत व आता Potsdam मध्ये तिचे यजमान Postdoc करतात. त्यांची मुलगी नायशा इथल्या Kindergartenमध्ये आहे. ही सगळी मुले अत्यंत मनमिळाऊ आणि लाघवी आहेत. खरंच हे सगळे एकत्र असल्यानेच सर्वजण एकमेकांसाठी खूप सुंदर सपोर्ट सिस्टीम बनले आहेत. स्वतःच्या देशाच्या बाहेर वर्षानुवर्ष राहणे आणि एक समतोल आयुष्य बांधणे यासाठी चांगल्या मित्र-मैत्रिणींची अत्यंत गरज असते.
11 March
आज मी खूप खुश आहे कारण मला मितालीने सपोर्ट न करता मी सायकल चालवली. आज पहिल्यांदा आम्ही मितालीच्या कॅन्टीनमध्ये गेलो. छोले, भात, सॅलड असे जेवण घेतले. आज मला मितालीच्या ओळखीची झारा नावाची जर्मन मुलगी भेटली. तिने आम्हाला तिच्या केबीनमध्ये invite केले. झारा केमिस्ट्री मध्ये पीएचडी करते आहे. तिला gardeningची खूप आवड आहे आणि विशेष म्हणजे तिला तिखट आवडते सर्वसाधारण German माणूस मिरचीचा वास घेऊन जेवतो. तिने आम्हाला एक वेगळ्या प्रकारचे मिरचीचे झाड दिले.


संध्याकाळी घरी आल्यावर bag ठेवून आम्ही मितालीच्या घराजवळ फॉरेस्ट एरिया आहे तिथे फॉरेस्ट ट्रेकला गेलो. दोन्ही बाजूला सागाची, बांबूची झाडे आहेत आणि मधुन पायवाट आहे. बरेच लोक तिथे फिरायला येतात आणि महत्त्वाचे म्हणजे एकदम सेफ आहे.












Leave a Reply