Potsdam

Potsdam

बाहेर पडण्याआधी मितालीने माझा ऑनलाइन युनिव्हर्सल पास काढला कि जो त्या पूर्ण दिवसासाठी बस, tram, लोकल, रिजनल ट्रेन या सर्वांसाठी उपयुक्त आहे. सर्वप्रथम आम्ही युनिव्हर्सिटीच्या main कॅम्पस मध्ये आलो. त्याला लागूनच Sanssouci (सांस-उसी) पार्क आहे. Sanssouci म्हणजे “No worries”! तिथे खूप पायऱ्या असून एकदम वरती गेल्यावर सर्व Potsdam दिसते.

नंतर तिथून आम्ही Potsdamची सगळ्यात मोठी पवनचक्की बघितली. ती हिस्टॉरिकल विंडमिल असून देखील फंक्शनल आहे. लोकं तिथे धान्य आणून दळायला देऊ शकतात. Peak summerमध्ये, विकेंडला या पवनचक्कीच्या वरपर्यंत सुद्धा जाता येते. नंतर Institute of Astrophysicsला गेलो; त्याच्या बाजूला Babelsberg नावाचा मोठा पार्क आहे. अतिशय विस्तीर्ण असल्याने लोक तिथे ट्रेकसाठी पण येतात. तिथला रस्ता सरळसोट नाहीच पण वर-खाली चढ-उतार; खूप छान रीतीने रस्ते बांधले आहेत. तिथे एक नदी पण आहे. स्प्रिंग मध्ये तिथे बोटिंग करतात. थोडा चढ चढून गेले की तेथे Babelsberg पॅलेस आहे. परत त्याच्यापुढे चालले की Rapunzel (रॅपुन्झेल) tower आहे.

रपुंझेल टॉवरची गोष्ट म्हणजे एक राजकन्या दिसायला अतिशय सुंदर असल्याने तिचे वडील म्हणजे राजा तिला एका उंच टॉवरवर कैद करून ठेवतो. बहुदा राजाराणी तिची सावत्र आई वडील असतात. राजकन्या अतिशय सुंदर असते. तिचे केस सोनेरी असून खूप लांब असतात. एकदा दुःखी मनाने टॉवरवर खिडकीत बसलेली असताना एक राजपुत्र तिथे येतो आणि त्या राजकन्येला बघून तिच्या प्रेमात पडतो. ती त्या खिडकीतून तिचे सोनेरी केस खाली सोडते आणि त्या केसांना धरून तो राजपुत्र मनोऱ्यावर चढतो आणि त्या राजकन्येची त्या कठीण परिस्थिती मधून सुटका करून घेऊन जातो अशी कथा आहे.

माझे सायकल पुराण (10 March)

आदल्या दिवशीच्या पायपिटीने खूप थकलेलो. आज नाश्त्यासाठी उकडलेले अंडे, ब्रेड, चीज, आलू पराठे आणि चहा असा भरपेट नाश्ता खाऊन नंतर एक तासभराने बीटची कोशिंबीर खाऊन आम्ही मितालीच्या workplaceला म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये गेलो. तिथे मितालीला कामासाठी केबिन आहे. तिथे दुसरे कोणी नसल्याने मी पण तिच्याच बरोबर तिथे बसले.

जर्मनीमध्ये सायकलीचे प्रमाण खूप जास्त आहे आणि वयाच्या 14-15-16 ही वर्ष मी खूप सायकल चालवली आहे त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून मितालीच्या मागे लागले होते की मला पण सायकल चालवायची आहे. As a student, मितालीला रोज तीन तास सायकल राईड फ्री आहे. मला कितपत सायकल चालवता येईल याची शंका होती कारण एकतर चाळीस-पंचेचाळीस वर्षाचा gap आणि वजनातील भरभक्कम वाढ; तसेच इतकी वर्षे सायकल हातात धरली नसल्याने बॅलन्सिंग जमेल की नाही हे दडपण. सायकल हातात घेतल्यावर समजले की आता परत पहिल्यापासून श्रीगणेशा!

पुढे वाचा…

मितालीचा birthday! (12 March)

व्हेरी हॅपी बर्थडे डिअर मिताली!! कितीतरी वर्षांनी बर्थडे तिच्या बरोबर राहून साजरा करणार आहे. सर्वप्रथम आम्ही बाहेर पडलो, पहिल्यांदाच rt-pcr टेस्ट केली; ती टेस्ट नेगेटिव आली. टेस्ट केली एवढ्यासाठी की मॉलमध्ये वगैरे गरजेचे आहे. प्रथम पोस्टात गेलो तिथे त्यांनी माझा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून माझी डिजिटल सिग्नेचर करून घेतली मग माझं सिमकार्ड तीन महिन्यांसाठी घेतले आहे ते ऍक्टिव्हेट झाले. आता मी इथल्या नंबरने कॉल करू शकते व इंटरनेट सुद्धा वापरू शकते.

यानंतर आम्ही Berlinला जायला निघालो. Potsdam आणि Berlin अगदी जवळ जवळ आहेत पण दोन्ही मधील कन्स्ट्रक्शन एकदम वेगळे. Potsdamमध्ये villasचे प्रमाण जास्त आहे त्या उलट Berlinमध्ये मोठ्या म्हणजे पाच-सहा मजली बिल्डिंग आहेत. रोड तसे काही खूप प्रशस्त आहेत असे नाही पण ट्राफिक जाम अजिबात नाही कारण रोडवर अजिबात पार्किंग नाही. रोडच्या बाजूला पार्किंग slots आहेत त्यामुळे ज्यांच्या घरी पार्किंग नसेल ते रोडवर जिथे पार्किंग slots आहे तिथे पार्किंग करू शकतात.

पुढे वाचा…

जर्मनs आणि जर्मनी बद्दल निरीक्षण (16 March)

जर्मन लोकांबद्दल माझे निरीक्षण असे की मुद्दाम बोलायला येणार नाहीत पण मदत मागितल्यास तत्परतेने मदतीला येतील. तसेच ते जास्त बोलत नाहीत कारण खूप चांगले इंग्लिश बहुतेक कोणालाच येत नाही. त्यामुळे ते non-जर्मन माणसांशी बोलताना कम्फर्टेबल नसतात. जर्मन माणूस हा फॅमिली man आहे. तो त्याच्या घराच्या आजूबाजूच्या एरियामध्ये मुलांसाठी वॉच टॉवर, घसरगुंड्या, झोपाळे तयार करून मुलांची इंटरटेनमेंटची हौस पुरवतो. तसेच त्यांच्याकडे लहान बाळ एक तर बाबागाडीत बसते, नाहीतर त्याची स्वतःची छोटी bicycle असते. त्यावर तो आई-बाबांच्याबरोबर सायकलींग करून रोड क्रॉस करणे, सायकल चालवणे असं करतो. त्यामुळे खूप लहानपणापासून ट्रॅफिक सेन्स डेव्हलप होतो.

मितालीचे घर
पुढे वाचा…

German supermarkets (21 March)

आज आम्ही इथल्या Rewe नावाच्या सुपर मार्केटमध्ये गेलो. तिथे तासभर गेला आमचा पण तो कसा गेला ते आम्हाला कळलेच नाही. इथे bread, cheese, दह्याचा, nonvegचा section. बापरे! मी इथे आल्यावरच पाहिले. Cheese तरी किती किती नानापरी! आता Easter जवळ असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स, वेगवेगळे ज्यूसेस, तऱ्हेतऱ्हेच्या अल्कोहोलच्या बाटल्या, अंडी उकडून त्याचे कव्हर वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले. खूप नयनरम्य दिसते सर्व. इथे दर आठवड्याला Aktion (आक्सीओन) असे लाल रंगाचे tags लावलेले असतात. वेगवेगळ्या भाज्या, फळे, चॉकलेट ते कशाला असेल हे सांगता येत नाही. पण ते red tag ज्याला असेल ते म्हणजे सेल. नेहमीपेक्षा कमी किंमत असते. इथली सुपरमार्केट्स रात्री नऊ ते दहा पर्यंत उघडे असतात आणि रविवारी कंपल्सरी बंद. रविवारी सुट्टी.

Colorful Easter eggs
Rewe supermarket

Johnnyची भेट (22 March)

आज आम्ही कॅन्टीनला (Mensaला) जेवायला गेलो. जेवण्यासाठी एक मेक्सिकन व्हेज बर्गर आणि मेक्सिकन डिश चिली विथ बीन्स घेतली होती. जेवणानंतर मिताली तिच्या युनिव्हर्सिटीत कामासाठी गेली आणि मी सायकल चालवायला.

पुढे वाचा…

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply