Berlin wall

मग last stop, Berlin वॉल कडे आम्ही कूच केले. हिटलरचा बिमोड झाल्यावर ईस्ट जर्मनी रशियाने ताब्यात घेतली व वेस्ट जर्मनी capitalist अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स यांनी ताब्यात घेतली. हा काळ दुसऱ्या महायुद्धानंतर चा होता. रशियामध्ये कम्युनिजम असल्यामुळे East जर्मनीमध्ये पण कम्युनिझम लादला गेला.

East Germanyमध्ये लोकांवर खूप बंधने होती. स्वतःची प्रॉपर्टी खरेदी करता यायची नाही, गव्हर्मेंटच्या विरुद्ध बोलायचे नाही, western वर्ल्ड ideologyबद्दल पुस्तके वाचायची नाहीत, त्यांचे पिक्चरपण पाहायचे नाहीत. याउलट West जर्मनी मध्ये खूप फ्रीडम होता .लोकांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागता यायचे. त्यामुळे East जर्मनीमधील लोक West जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात पळून जायला लागले. मग रशियाच्या दबावाखाली येऊन 1970मध्ये जर्मन सरकारने Berlin वॉल बांधली, की ज्यामुळे ईस्टमधले germans वेस्टमध्ये जाणार नाहीत.

East जर्मनीमधील लोकांच्या दृष्टीने West जर्मनी म्हणजे स्वर्ग होता. म्हणून Berlin वॉल बांधल्यानंतर East germans त्या भिंतीवरून उडी मारून तिकडे जायचा प्रयत्न करायचे. पण जर गार्डने पाहिले तर ते त्यांना गोळ्या मारायचे. या काळात बरेच East Germans मारले गेले. पुढे 1991मध्ये लोकांच्या दबावामुळे गव्हर्मेंटला ही भिंत पाडावी लागली आणि जर्मनी पुन्हा एकसंध झाली.

या सगळ्या प्रसंगांचे Berlin वॉलवर चित्रण केले गेले आहे. संपूर्ण Berlin वॉल खूप मोठी असली तरी सलग एक किलोमीटरचा भाग preserve केला आहे. त्यावर आर्टिस्ट Graffiti पेंटिंग करतात. अतिशय क्रिएटिव्ह आणि अर्थपूर्ण paintings! पेंटर त्यांच्या कल्पनाशक्तीने पेंट करतात आणि बघणाऱ्याने त्याची कल्पनाशक्ती वापरून त्याचा अर्थ लावायचा. आम्ही खूप सारे फोटो घेतले.

हा Berlin Eastचा भाग Drug peddlersसाठी कुप्रसिद्ध आहे. येताना परतीच्या वाटेवर Berlin रेल्वे स्टेशनला Turkish बेकरीमध्ये आम्ही बकलावा नावाचे स्वीट खाल्ले- आपल्याकडची पाकातली पुरी आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट चुरा, गुलकंद, पिस्ता असे stuffing.

Turkish baklava

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply