14 April
आम्ही बरोबर 6:05ला घराबाहेर पडलो. तिथून दोन मिनिटावर बस स्टँड होता. बस घेऊन आम्ही स्टेशनला वेळेआधीच पोचलो. दोन ट्रेन बदलून आम्ही स्विझर्लंडला पोचलो. स्टेशनचं नाव St. Gallen. तिथून Cheese फॅक्टरीला बसने गेलो.



Cheese फॅक्टरीमध्ये इतकी इंटरेस्टिंग आणि informative sessions होते की तिथे एक तास ऐवजी दोन ते अडीच तास कसे गेले ते आम्हाला कळले सुद्धा नाही. बसने चीज फॅक्टरीच्या स्टॉपला उतरल्यावर दोन मिनिटांवर ही फॅक्टरी आहे. या भागाचे नाव Appenzell असे आहे, म्हणून तिथल्या cheeseचे नाव Appenzeller cheese असे आहे. मितालीने इथे यायच्या आधीच Cheese + Chocolate फॅक्टरी तिकीट बुक केले होते. त्यामुळे तिथे रेस्टॉरंटमध्ये शिरल्यावर receptionistला तिकीट दाखवलं तेव्हा तिने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चीज क्यूबs असलेले दोन बॉक्स आणि दोन छोटे छोटे कापडी बटवे, सोबत एक चावी दिली. ही सर्व सामग्री चीज फॅक्टरीमधल्या टूर साठी होती. नंतर सांगितल्याप्रमाणे entranceला एक बारकोड स्कॅन करून, लाकडी स्क्रीनवर इंग्लिश भाषा निवडून आम्ही पुढची सगळी इन्फॉर्मेशन, व्हिडिओज, मूवीs सुद्धा इंग्लिश मध्ये बघितली.



थोड्या थोड्या अंतरावर काही काही ठिकाणी बंद लाकडी बॉक्स होते. त्या बॉक्सला चावी लावून उघडले की आम्हाला बॉक्समध्ये दिलेल्या चीज क्यूब प्रकारापैकी एका cheeseचे नाव, त्याचा प्रकार, याबद्दल सगळे वर्णन दिसायचे. मग त्या ठिकाणी ते चीज टेस्ट करून पुढे व्हायचं. पाच प्रकारचे चीज क्यूब आम्हाला दिले होते आणि बरोबर toothpick. या boxचा एक फायदा असा पण की टूर संपल्यावर तिथल्या शॉपमध्ये नंतर तुम्हाला कुठले cheese घ्यायचे ते ठरवता येते.
नंतर एका भागात तिथे गाईंच्या गळ्यात बांधण्याच्या पारंपरिक घंटा होत्या- यांना Cowbells असे म्हणतात. तिथे एका मोठ्या स्क्रीनवर तिथल्या एका local Herdsmanचा interview होता. बाजूच्या पॅनलवर वेगवेगळ्या भाषांचे ऑप्शन्स होते, ते सिलेक्ट केल्यावर त्याप्रमाणे सबटायटल्स येत होत्या. या इंटरव्ह्यूमध्ये गाईंची दिनचर्या, गाईला दिवसभरामध्ये काय काय खायला देतात, गाईंची काळजी कशी घेतात याबद्दल तो बोलत होता. या एरियामध्ये गाईंचे प्रमाण खूप आहे- इतके की दर पाच माणसांमागे एक गाय! गाईला हे लोक जिवापाड जपतात. Alpsमध्ये हिरवेगार कुरण आहे, ते गवत चरायला नेणे. गाईंबरोबर जे माणसे असतात ते उतारावर त्या गळ्यातल्या घंटा काढून स्वतः कॅरी करतात, कारण त्या घंटेचे वजन बरेच असल्याकारणाने उतारावर गायींचा तोल जाण्याची शक्यता असते. त्यांचे वेळेवर खाणे-पिणे, ठरलेल्या quotaप्रमाणे शंभर लिटर पाणी, ठरल्याप्रमाणे गवत, विटामिन्स, घोड्याला जसे खरारा करतात त्याप्रमाणे गाईला मसाज, वर्षातून सात-आठ वेळा पेडिक्युअर, दररोज त्यांची आंघोळ असे छोटे पण राजेशाही जीवन असते. गाईंचे आयुष्य पंधरा-वीस वर्षे असते पण त्यांचे प्रॉडक्टिव लाईफ हे पाच वर्षांपेक्षा जास्त नसते. त्यांचे वेलफेअर लॉज खूप स्ट्रिक्ट असतात. जर त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर जास्तीत जास्त सहा तास प्रवास, त्यापेक्षा जास्त नाही. त्यांना सर्व टाईमटेबलप्रमाणे जेवण, खाणे, रवंथ करायला वेळ, दूध काढणे इ. गाईंची वेगवेगळी नावे असतात. काही फेमस नावे- Angela, Oliva, Bella, इ. आहेत. इथे Appenzeller dogsसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. हे घर आणि शेती यांचे राखण करण्यासाठी खुप उपयोगात येतात.








Cheese passport
Cheese विकण्यापूर्वी त्यावर पासपोर्ट चिकटवतात. यावर बऱ्याच प्रकारची माहिती असते- जसे कुठल्या breedच्या गाईचे दूध वापरले आहे, कुठल्या फार्मवरचे आहे, किती वेळासाठी cheese mature केले आहे (तीन महिने, सहा महिने, नऊ महिने आणि एक वर्ष), गाईचे नाव, आडनाव, वय, गाय कुठल्या regionमधली आहे इ. Switzerlandमध्ये 5 regions आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे cheese बनवतात. Emmentaler cheese हा सर्वात प्रसिद्ध swiss cheeseचा प्रकार आहे. Engelberg, Einsiedein, Appenzeller आणि Gruyeres हे बाकी चार प्रकार.




प्रत्येक मोठ्या 5kg cheeseवर, जो राउंड शेप मध्ये असतो, त्यावर चिटकवलेला असतो. तुम्ही cheese विकत घेताना किती authentic आहे याची चौकशी करून विकत घेऊ शकता .हे सर्व बघून, नंतर जे herbs वापरतात ते तुम्ही तुमच्याजवळ जो बटवा दिलेला आहे त्यात घेऊ शकता. सगळे वाळवलेले माउंटेन herbs तिथे होते. ते सगळे herbs थोडे थोडे आम्ही दोन्ही बटव्यात घेतले व आम्ही cheese फॅक्टरीचा निरोप घेतला. Zoo बघायचा राहिला होता कारण तिथे साडेपाचला इंट्री क्लोज होते आणि शिवाय बसने उतरल्यावर वीस-पंचवीस मिनिटे walk. आम्ही 2:50 वाजता तिथून zooसाठी बस होती तिथे पोचलो. पण हा हन्त! आमच्या डोळ्यासमोरून zooची बस सुटली! आम्हाला एक मिनिटं उशीर झाला. नंतर जवळजवळ पाऊण तासाने दुसरी बस होती .पण त्या बसने आम्ही पोहोचेपर्यंत आणि तिथून निघेपर्यंत चॉकलेट फॅक्टरीची बस मिळाली नसती, म्हणून आम्ही zooचा मोह सोडला. तशीही चॉकलेट फॅक्टरी सहा वाजता बंद होणार होती. तसेच परतीची ट्रेन 06:55 pmला होती. त्या ट्रेनने आम्हाला रात्री साडे दहा वाजणार होते. त्यामुळे आम्ही चारच्या ट्रेनने आणि नंतर बसने चॉकलेट फॅक्टरीला गेलो.








Leave a Reply