14 April

चॉकलेट फॅक्टरीचे नाव होते Maestrani चॉकलेट फॅक्टरी! ही फॅक्टरी Switzerlandमध्ये असून 1829 साली सुरू झाली. आम्ही तिथे गेल्यावर आमचे तिकीट दाखवल्यावर गेट उघडले गेले आणि आम्ही चॉकलेटच्या दुनियेत शिरलो. तिथे शिरल्याबरोबर समोरच खूप सारे cowbells एकत्र पुंजक्याने आठ ते दहा फूट उंचीपर्यंत लावल्या होत्या. मग तिथे चॉकलेटचा शोध कसा लागला यावर एक शॉर्ट फिल्म दाखवली. यासाठी बसण्याच्या seats कॅडबरीसारख्या रंगाच्या आणि तशाच आकाराच्या होत्या. या चॉकलेटसाठी swiss गाईचे दूध वापरतात. कोकोच्या बिया Peru या देशातून मागवतात आणि त्यासाठी लागणारी साखर स्विस बीटरूट पासून तयार करतात. आतमध्ये शिरल्यापासून चॉकलेटचा नुसता घमघमाट सुटला होता आणि मन एकदम उडू उडू झालं होतं! आमची चॉकलेट फॅक्टरीची टूर सुरू झाली.


पहिल्या दालनात चॉकलेटसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू कुठून कुठून येतात, त्यांची काळजी कशी घेतात, त्या कोकोच्या बिया, ज्या Peru देशातून मागवतात, त्यांचे क्वालिटी कंट्रोल करून त्यातला सुपिरियर भाग वेगळा करून त्या कशा भाजतात आणि त्याची पावडर कशी करतात, तसेच यासाठी दूध वापरतात ते स्विस गाईंचे दूध वापरले जाते इत्यादी माहिती वेगवेगळ्या प्रकारे दाखवली होती. नंतरच्या दालनात लहान मुलांसाठी काही क्षणचित्रे आणि काही खेळ या माध्यमातून मुलांचे प्रबोधन केले होते. पुढे गेल्यावर काचेच्या कव्हर-बंद बॉक्समध्ये अनुक्रमे white, milk आणि dark चॉकलेट melt होत होते. प्रत्येक बॉक्सला एक नळ होता. तो नळ फिरवला की त्यातून मेल्टेड चॉकलेट नळाद्वारे बाहेर येत होते. बाजूला प्लास्टिक चमचे वर्टीकल बॉक्समध्ये होते. प्रत्येक नळाच्या खाली एक खोलगट tray होता, जेणेकरून नळातून चॉकलेट घेताना खाली जमिनीवर सांडणार नाही. त्याला लागूनच प्रत्येक चॉकलेट ड्रमच्या बाजूला वेस्टेज बॉक्स होता, त्यात used चमचे टाकायचे. चमचे साधारण अर्धा टीस्पून एवढे एवढे होते, खूपच छोटे! मी आणि मित्तलने प्रत्येक चॉकलेटचे पाच-सहा चमचे तरी खाल्ले. त्यातून जे चॉकलेट येत होते ते warm होते. त्यामुळे अजुन मजा आली. लहान मुले, त्याबरोबर त्यांचे आई-बाबा पण या मेल्टेड चॉकलेटची मजा लुटत होते.



नंतर पुढच्या दालनात फोटो booth होता. तिथे उभे राहून पोज दिल्यावर फोटो प्रिंट होऊन स्क्रीनवर लगेच दिसत होता. मग तिथे आपला email address द्यायचा की ते तुम्हाला तो फोटो मेल करतात. आम्हाला फोटो त्याच दिवशी संध्याकाळी मेलवर मिळाला. त्यानंतर बाहेर पडल्यावर एक लांबलचक passage होता. तिथे छोटे-छोटे पडदे थोड्या थोड्या अंतरावर लावले होते. त्याला पुढे चाक लावले होते; ते फिरवले की चॉकलेटचे प्रोडक्शन, त्याचे डिझाईन, वड्या कशा पडतात, ड्रायफ्रूट्स कसे मिक्स होतात आणि पॅकिंग कसे होते ते दाखवत होते.

तिथेच बाजूला तीन-चार vending मशीन होती. त्यामध्ये रेगुलर विकण्याची चॉकलेट्स pack झाल्यावर, कटिंग केलेल्या चॉकलेटच्या चुर्याची परत चॉकलेटs होऊन, ती पॅक होऊन, कन्व्हेअर बेल्टवरून vending मशीनमध्ये पडत होती. प्रत्येक मशीनच्या बाजूला एक चिमटा लावला होता, त्या चिमट्याने gapsमधून चॉकलेटs घ्यायची, तुम्हाला पाहिजे तेवढी! आम्ही प्रत्येक मशीनमधून भरपूर चॉकलेटs घेतली आणि खाल्ली पण. Passageच्या दोन्ही बाजूला काचा लावलेल्या होत्या आणि खाली काचेतून अवाढव्य machinery दिसत होती. Melt केलेल्या चॉकलेटच्यामध्ये ड्रायफ्रुट्स चुरा कसा mix होतो, त्याच्या वड्या कशा काढल्या जातात, त्याचे inner पॅकिंग आणि outer पॅकिंग कसे केले जाते, आणि मग ते बॉक्समध्ये कसे pack केले जाते हे दिसत होते. तिथे काही माणसे मशिनच्या साह्याने काम करत होती.

मग आम्ही ते सगळे बघून चॉकलेटsचा आस्वाद घेऊन शेवटच्या दालनात आलो. तिथे तुमचे चॉकलेट तुम्ही बनवायचे, तुम्ही डेकोरेट करायचे अशी योजना होती. आम्ही त्या काउंटरवर गेल्यावर तिथल्या मुलीने विचारले की base कसा हवा- डार्क, white चॉकलेट की milk चॉकलेट? आम्ही milk चॉकलेट असे सांगितले. मग तिने आम्हाला 3×6 लांबीचा बेस, जो प्लास्टिक mouldच्या आतमध्ये बसवला होता, त्यात मेल्टेड milk चॉकलेट ओतून दिला. मग पुढे छोट्या छोट्या झाकणाच्या ट्रेमध्ये चॉकलेट बॉल्स, cornflakes, gems, hazelnutचा चुरा, रोस्टेड बदाम, choco chips आणि रंगीबेरंगी छोटे-छोटे balls या सर्व वस्तूंच्या साहाय्याने तुम्ही तुमचा बेस डेकोरेट करायचा. तिथे मध्यभागी कूलिंग मशीन होते, त्याला पाच levels होत्या. सगळ्यात खालून तुम्ही तुमचा tray ठेवला की तो पाचही levelsमधून पार होऊन, outer गेटमधून तो base set होऊन बाहेर येतो. या सर्व प्रोसेसला 10 ते 15 मिनिटे लागतात. मग last टेबलवर रिकाम्या प्लास्टिक बॅगs होत्या आणि सेलोटेप ऐवजी त्या कंपनीच्या नावाचे स्टिकर असते. तुम्ही तुमचे चॉकलेट प्लास्टिकमध्ये कवर करून, वरती स्टिकर्स लावून, पॅक करून तुमचे चॉकलेट घरी घेऊन जाऊ शकता. अर्थात यासाठी चार्जेस तिकीटामध्ये ऍड केलेले असतात.





या रूम मधून बाहेर पडल्यावर लगेच चॉकलेट शॉप होते. तिथे आम्ही युवीसाठी एक चॉकलेटचा ससा, मधुसाठी शोधून शोधून plain चॉकलेट आणि काही फ्रेंड्स आणि नातेवाईकांसाठी चॉकलेटs घेतली. तृप्त मनाने तिथून बाहेर पडलो. आयुष्यात पहिल्यांदाच एका दिवशी इतकी मनसोक्त चॉकलेट्स खाल्ली! तिथून बाहेर पडल्यावर लगेच बस स्टॉप होता. प्रथम बस आणि नंतर ट्रेन पकडून आम्ही रात्री अकराच्या सुमारास होस्टेलवर पोचलो.








Leave a Reply