Innsbruck

15 April

आज आम्ही इन्सब्रुक शहरात आलो आहे. Inn (इन) Austriaमधील नदी आहे. तिच्या काठावर हे शहर वसले आहे त्यामुळे शहराचे नाव इन्सब्रुक असे पडले. नदीचे पात्र बरेच मोठे आहे पण शहरातून जाताना काही ठिकाणी हे पात्र छोटे व निमुळते झालेले आहे. अतिशय स्वच्छ आणि नितळ पाणी घेऊन वाहते ही नदी. या शहराची दुसरी खासियत अशी इथले काही रस्ते बर्‍यापैकी अरुंद आहेत. रस्त्याच्या दुतर्फा इमारती असून देखील कुठूनही पाहिले तरी इमारतींच्यामधुन तुम्हाला आल्प्स खुणावतात. या इमारती फोटोमध्ये अगदी खेळण्यातल्या वाटतात- रंगीबेरंगी आणि सुबक. Skyscrapers नावाला देखील नाही. जास्तीत जास्त पाच सहा मजली.

Innsbruck शहर, Austria

आता थोडे विषयांतर करते. काल प्रॉपर जेवण मिळाले नसल्याने जरी पोट रिकामे नसले तरी काहीतरी भारतीय जेवण जेवावे असे वाटत होते. त्यामुळे मितालीने जेव्हा सांगितले की इथे जवळच इंडीयन रेस्टॉरंट आहे तेव्हा मी भलतीच खुश झाले. त्याच बरोबर मितालीचा मनात विचार आला की आपल्याला इथे येऊन जेमतेम महिना झाला तरी आपली ही स्थिती; मिताली किती मिस करत असेल मग! बरं घरी जेवण बनवले तरी आपणच बनवायचे आणि आपणच खायचं.

Rama restaurantमधले जेवण

आम्ही गेलो त्या हॉटेलचं नाव रामा असे होते. हॉटेल मालक पंजाबी होता आणि गप्पिष्टदेखील! शंकर-पार्वती, गणपती, गौतम बुद्ध, गुरुनानक अशाप्रकारे फोटो फ्रेम होत्या आणि फार कलात्मकरीत्या हॉटेल सजवले होते. चहा, समोसा, पंजाबी दाल, राईस असं सगळं आम्ही ऑर्डर केलं. Expectationपेक्षा कितीतरी पटींनी रूचकर जेवण होतं. भरपूर पेटपूजा झाल्यावर आम्ही इन्सब्रुक शहर फिरायला बाहेर पडलो.

Inn नदीवरचा पूल

सर्वप्रथम आम्हाला एक लाकडी पूल लागला; खालून Inn नदी वाहत होती. तिथून Alps पर्वतरांगा खूपच विलोभनीय दिसत होत्या. पुढे आम्हाला एक गार्डन लागले. गार्डनमध्ये वेगवेगळ्या रंगांची सुंदर फुलं होती. बरेच जण तिथे झाडाखाली बसून जेवणाचा आनंद घेत होते, काही जण पुस्तक वाचनाचा आनंद लुटत होते. तिथे एका बाकावर बसून आम्ही ढगांचे वेगवेगळे आकार, तसेच डोंगराळ भागातले सौंदर्य हे सर्व डोळ्यांनी टिपून घेतले. बागेत इतके relaxing atmosphere होते की तिथून पाय काढावा असं वाटतच नव्हतं.

मग आम्ही सिटी सेंटरला पोहोचलो. तिथे मॅग्नेटsची खरेदी केली, तिथल्या सिटी टॉवर वरुन इन्सब्रुक शहराचा नजारा बघितला आणि मग परतीच्या वाटेला लागलो. रूमवर जाताना आमची नजर सहज तिथे असलेल्या एका फूड फेस्टिवलवर गेली. तिथे वेगवेगळ्या देशाचे food trucks होते- Spanish, Italian, Indian, Mexican, Turkish, Hungarian, इत्यादी…आम्ही Spain या देशाचा या डिश Churros खाल्ली. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या काड्या तेलात तळून, वरतून पिठीसाखर व चॉकलेट सॉस घालून serve केले जाते. अत्यंत चविष्ट! अशाप्रकारे आमचे इन्सब्रुक भ्रमण संपले.

Food festival

परतीचा प्रवास

आज आमचा इन्सब्रुक सोडण्याचा दिवस. काल रात्रीच आम्ही आमचे सर्व सामान व्यवस्थित pack केले होते, कारण सकाळी आम्हाला तीन ट्रेन पकडून Berlinला जायचे होते. पैकी पहिली ट्रेन साडेआठला इन्सब्रुक स्टेशन वरून होती. त्यामुळे आम्ही 7:45ला घरातून निघालो. निघायच्या आधी मितालीने कॉफी आणि कुकीज असा ब्रेकफास्ट तयार ठेवला होता.

कॉफी घेतली, cookies खाल्ल्या आणि काही राहिले नाही ना आमच्या कंपार्टमेंटमध्ये हे बघून आम्ही निघालो. साधारण 8:15ला स्टेशनला पोहोचलो. तेवढ्यात मितालीच्या लक्षात आले की फ्रिजमधले सामान घ्यायचं राहिलेच की! त्यात आम्ही स्विझरलँडच्या फॅक्टरी मधून घेतलेले दोन प्रकारचे चीज होते. खूप tension आले. मितालीने फोनमध्ये जरा पाहिले, calculations केले आणि म्हणाली की- आई, तू सामान्य घेऊन इथेच थांब. मी पटकन जाऊन आपले सामान घेऊन येते. मला विचार आला- आपली 8:30ची ट्रेन चुकली तर दुसरी आहे का? मिताली लगेच म्हणाली- 35 मिनिटांनी दुसरी ट्रेन आहे आणि आपली जी सलग पाच-साडेपाच तासाची ट्रेन आहे ती दुपारी तीन वाजता आहे. त्यामुळे ती लगेच गेली आणि 9ला परत आली. खूप धावपळ करावी लागली तिला. आम्ही स्विझरलँड होऊन आणलेले दोन-तीन प्रकारचे चीज त्या बॅगेत होते. बॅग आणल्याचे खऱ्या अर्थाने चीज झाले!

Munich-Berlinची ट्रेन दुपारी तीन वाजताची होती त्यामुळे आमच्याकडे बऱ्यापैकी वेळ होता. जवळच इंडियन रेस्टॉरंट होते तिथे दुपारचे जेवण घेण्याचा निर्णय घेतला. Ambience एकंदरीत रिफ्रेशिंग होता. Paneer chilli, रोटी, भात असे सर्व मागवले होते. जेवणानंतर रेस्टॉरंटतर्फे स्वीट डिश म्हणून आम्रखंड होते. जेवणापूर्वी आम्ही चहा सुद्धा मागवला होता. चहा छान होता व साखरेऐवजी त्यात मध टाकला होता. जरा वेळ रेस्टॉरंटमध्येच टाईमपास केला आणि साधारण दोनच्या सुमारास बाहेर पडलो. खूपच रमत-गमत आल्याने 2:40 झाले होते. Easter season असल्याने आम्हाला आधीच्या ट्रेन मध्ये न भूतो न भविष्यती अशी गर्दी लागली होती. त्यामुळे अशी गर्दी निदान पाच-साडेपाच तासाच्या प्रवासाला नको असा विचार करुन मितालीने seat रिझर्वेशन केले होते. साधारण 2:45ला ट्रेन आली पण 3 वाजेपर्यंत ट्रेनचे दार lock होते. बहुदा आतमध्ये क्लिनिंग करत असावेत. असो. धावत जाऊन seat पकडण्याची आम्हाला गडबड नव्हती कारण seats reserved होत्या. मधल्या काळात बऱ्यापैकी गर्दी झाली होती. सर्व लोक चढल्यावर आम्ही चढलो आणि आमच्या seats शोधून आम्ही स्थानापन्न झालो. बसल्यावर विचार करत होतो की आता लांबचा प्रवास आहे तर मस्त झोप काढूया, मग मस्त गप्पा मारत बसू.

तेवढ्यात आमच्या बाजूला दोघीजणी खूप भरलेल्या दोन-तीन बॅगा घेऊन आल्या. आमच्या बाजूच्या seats या दोघींच्या होत्या. बहुदा दोघी मैत्रिणी असाव्यात असा आमचा समज झाला. पण पाच-दहा मिनिटात बोलण्याचा पद्धतीवरून मला असे वाटले की त्या मायलेकी असाव्यात. अर्थात मी जिला आई समजत होते ती पण अतिशय मॉडर्न होती. मिताली ज्या सीटवर बसली होती ती window सीट त्यांची होती. त्यावर मिताली चटकन उठून म्हणाली की तुम्ही तुमच्या seatवर बसू शकता. त्यावर बाकी काही नाही पण समोरचीला जर्मन बोलता येते याचा तिला खूप आनंद झाला असावा. ती उतरली की- नाही, नाही आम्ही या seats वर बसतो. No Problem! आणि त्यानंतर ती अखंड बडबड करत होती! तिचे नाव Joanna आणि ती दुसरी मुलगी म्हणजे Emmy- तिची सोळा वर्षांची मुलगी. नुकतीच दहावी झालेली. तिचे वय 16 पेक्षा जास्त वाटत होते- कारण, तिची उंची. सहा फूट तरी नक्की असेल! Joanna मूळची Polandची होती आणि सध्या ती वेस्ट बर्लिनमध्ये settle झाली आहे. Working as an accountant. तिच्या मुलीने सेकंड लैंग्वेज म्हणून इंग्लिश सिलेक्ट केली आहे. दोघीजणी आपल्यासारख्या मिडलक्लास होत्या. Joannaने मितालीला तिची सर्व स्टोरी सांगितली व मितालीला पण बरेचसे प्रश्न विचारून तिच्याबद्दल माहिती घेतली. त्या दोघी आमच्या आधी उतरल्या. मितालीने त्या उतरण्याआधी सेल्फी घेतला, फोटो एक्सचेंज केले. असो. अशाप्रकारे आमचा प्रवास खूप मजेत झाला!

Joanna आणि Emmy बरोबरचा सेल्फी

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply