Gyermekvasút

18 May

मग आम्ही tramने निघालो. नंतर नंतर tram अगदी जंगलासारख्या भागातून आणि वर जात होती. मला लक्षात येत नव्हते आपण कुठे चाललोय. मितालीला विचारले पण ती सांगेना. तिने माझ्यासाठी सरप्राईज ट्रिप ठरवली होती. Tramच्या शेवटच्या स्टॉपला आम्ही उतरलो. Tram आता बऱ्यापैकी उंचावर आली होती. समोरच पंचवीस-तीस पायऱ्या होत्या, त्या चढून आम्ही वर गेलो तर तिथे समोरच आम्हाला दहा-बारा वर्षांची मुले railway guardsच्या गणवेशात दिसली व आपल्या माथेरानसारखी पिटुकली ट्रेन दिसली! त्या ट्रेनचा खालचा अर्धा भाग लोखंडी पट्ट्यांनी बांधला होता म्हणजे त्या पट्ट्यातून हवा जात-येत होती. वरचा अर्धा भाग उघडा होता- फक्त खिडकीच्या फ्रेम्स होत्या. वरती छत होते.

ही जगातली सर्वात longest routeची ट्रेन आहे की ज्याचे मॅनेजमेंट दहा ते चौदा वर्षांची मुले सांभाळतात. फक्त ट्रेन चालवणारा व त्याचा सहाय्यक हे मोठे माणसं असतात. तिकीट ऑफिसमध्ये सर्व मुले-मुलीच होते. तिकीट विंडोवर एक दहा-बारा वर्षांची मुलगी होती. गाडीचा प्रवास चाळीस मिनिटे जाताना व परत खाली येताना चाळीस मिनिटांचा आहे.

Children’s railway

या प्रवासात 6-7 stations आहेत. काही ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने सिंगल tracks आहेत. स्टेशन जवळ आले की रुळाला एक फाटा फोडून दोन ट्रॅक्स दिसतात. प्रत्येक स्टेशनवर दोन-तीन लहान मुले युनिफॉर्ममध्ये व त्यांच्यावर सुपरव्हिजन करणारा एक रेल्वे ऑफिशियल. गाडीला चार डबे होते त्यापैकी एक डब्बा बंदिस्त होता- फक्त काचांनी बंदिस्त केला होता. नंतर समजले की लहान मुलांच्या स्कूल ट्रीपसाठी (सहा-सात वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी व त्यांचे शिक्षक) तो डबा राखीव आहे. प्रत्येक डब्यात दोन टी.सी. असतात. त्यातला एक सिनियर असतो व दुसरा जूनियर. सिनियर मुलगा नवीन मुलाला तिकीट कसे पंच करायचे? तिकीट चेक करताना काय काय तपासायचे? तसेच प्रत्येक स्टेशनला असलेल्या त्यांच्या वयाच्या गार्डन कसे सिग्नल द्यायचे? हे दाखवत होता. गार्डचे काम हिरवा झेंडा दाखवणे व सल्यूट करणे. हे रेल्वेचे छोटे कर्मचारी अगदी neat आणि tidy युनिफॉर्म मध्ये होते. बरोबर शिट्टी, cap, shoes असे सर्व होते.

एका लहान T.C. बरोबर काढलेला फोटो

हंगेरीमध्ये असा सरकारी प्रोजेक्ट असतो की ज्या मुलांना रेल्वेच्या अशा प्रोजेक्ट मध्ये काम करायचे आहे त्यांनी apply करायचे. सिलेक्शन झाल्यावर त्यांना ट्रेनिंग देतात व अंडर सुपर्विजन त्यांनी हे काम केल्यावर मुला-मुलींना त्याचा मोबदलापण मिळतो. आमच्या डब्यामध्ये जो छोटासा टी.सी. होता त्याने आमचे तिकीट चेक केले आणि पंचदेखील केले. मी त्याला खुणेनेच विचारले- “सेल्फी काढू का?” त्याने होकार दिल्यावर आम्ही सेल्फी काढला. जर भाषेची अडचण नसती तर मी त्याला बरेच प्रश्न विचारले असते.

ट्रेनचा एकूण प्रवास एक तास वीस मिनिटाचा आहे- चाळीस मिनिटे जाताना व चाळीस मिनिटे येताना. वाटेत एक बोगदापण आहे. त्यामध्ये शिरल्यावर गाडीत लाल हिरवे दिवे लागतात, खूपच सुंदर दिसते. पूर्ण प्रवास जंगलातून होतो. हायकर्ससाठी जंगलामधून ट्रॅक तयार केले आहेत. तुम्ही हायकिंग करत आहे आणि समजा तुम्हाला आता पुढे ट्रेनने जायचे आहे तर तुम्ही हात दाखवून ट्रेन थांबून ट्रेनमध्ये चढू शकतात. ही ट्रेन घनदाट जंगलातून जात असल्याने प्रचंड थंडी व बोचरा वारा होता. तसेच सूर्यप्रकाश पोचत नसल्याने गारवा जास्तच जाणवत होता. निघतांना मितालीने जाऊन स्वेटर आणला म्हणून नाहीतर काही खरे नव्हते माझे! तापमान 8/9 degree असावे.

एक लहान मुलगी, स्टेशन मास्टरची ड्युटी करताना

शेवटच्या स्टेशनला उतरलो. तिथे गणवेशात सात-आठ मुले दिसली. मितालीने त्यांच्यापैकी एकाला विचारले की इथे काय आहे बघण्यासारखे? त्याला इंग्रजी येत नव्हते म्हणून त्याने इतर तीन-चार मुलांना बोलवून महत्प्रयासाने आम्हाला सांगितले की इथे observation पॉईंट आहे पण त्यासाठी तुम्हाला खालच्या बाजूला थोडे चालत जाऊन बसने जावे लागेल. पण लगेच हे पण सांगितले की एवढे काही खास नाहीये बघण्यासारखे. मग मितालीने गुगल सर्च करून ठरवले ट्रेनचा प्रवासच जास्त करण्यासारखा आहे- त्यामुळे खाली परत जाऊन अजून एक दोन पॉईंट आहेत ते बघावेत. मग आम्ही त्याच ट्रेनने खाली आलो व tramने सिटी सेंटरला पोचलो.

मग आम्हाला भूक लागली म्हणून एका बेकरीमधून आणि honey-क्रीम केक आणि बाकी इतर दोन-तीन पदार्थ घेतले. आम्हाला honey-क्रीम केक एवढा आवडला की बाकी पदार्थ रात्रीसाठी ठेवून अजून दोन हनी क्रीम केक pieces आणून खाल्ले!

Honey-cream cake

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply