Hostelमधली मंडळी

18 May

आज आम्हाला पूर्ण दिवस भटकायचे होते म्हणून सकाळी 8:15ला तयार होऊन पहिल्या मजल्यावर ब्रेकफास्ट रूम मध्ये गेलो. पाहतो तो काय, ब्रेकफास्टसाठी Full-on गर्दी! नाश्त्यासाठी ब्रेड, बटर, दोन प्रकारचे जाम, उकडलेली अंडी, cornflakes, दोन प्रकारचे ज्यूस, सफरचंद असं होते. आम्ही अंडी, ब्रेड, बटर आणि कॉफी असे घेऊन टेबल वर बसलो. आमच्या टेबलच्या समोरच्या बाजूला तिघेजण बसले होते. आशियाई वाटत होते. त्या तिघांपैकी एक जण आपल्या पूर्वीच्या हिंदी सिनेमातला Don दिसत होता.

त्याने सफारी घातली होती. डाव्या हातात घड्याळ, बोटांमध्ये बऱ्याच अंगठ्या आणि डोळ्याला black गॉगल. तोच त्यांचा लीडर होता. फक्त त्यालाच कामचलाऊ इंग्लिश येत होते. बाकी दोघांना इंग्रजीचा गंधही नव्हता. मितालीने त्या दोघांपैकी एकाला इंग्रजीमध्ये विचारले, की तुम्ही कुठून आलात? त्यांचा लीडर तिथे नसल्याने त्याने काहीच उत्तर न देता भाषा समजत नाही अशा अर्थाची खूण केली. तेवढ्यात त्यांचा लीडर आला. मग त्याने लीडरकडे बोट दाखवून त्याच्याशी बोला अशी खूण केली. त्याच्या तोडक्या-मोडक्या इंग्रजीमध्ये आम्हाला कळलेली माहिती अशी की ते ब्राझील मधून आले होते; ते बोलत होते ती पोर्तुगीज. त्याने आम्हाला विचारले की तुम्ही कुठून आलात वगैरे. नंतर मात्र भाषेच्या अडचणीमुळे असेल पण त्यांना आमच्याशी किंवा इतर कोणाशीही बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. पटापट नाश्ता करून ते निघून गेले. त्यांना पण आमच्यासारखा नाश्ता आवडलं नाही बहुतेक.

ते निघून गेल्यावर त्या खुर्चीवर एक दुसरा उंचापुरा, धिप्पाड, फुलाफुलांचा शर्ट घातलेला व चेहरा एकदम खतरनाक असा माणुस येऊन बसला. त्याची पण भाषेची अडचण असावी कारण कोणाशीही न बोलता शांतपणे आणि निगुतीने त्याने त्याचा नाश्ता बनवला आणि सर्व काही काट्या-सुरीच्या मदतीने! प्रथम त्याने ब्रेडला बटर लावले, मग दोन अंड्यांची टरफले काढून सुरी व काट्याच्या मदतीने अंड्यांचा चुरा केला. त्यावर मीठ-मिरपूड टाकून मिक्स केले. मग सुरीने ते सर्व मिश्रण ब्रेडवर पसरले आणि एकाग्रतेने त्या ब्रेडचे सूरीच्या साह्याने तुकडे करून काट्याने ते खाल्ले. जरा वेळाने आमचं लक्ष गेले तर त्याचे खाणे संपले होते व प्लेट एकदम धुतल्यासारखे स्वच्छ! हा जो ब्रेड होता तो जरा कडक होता आणि बटर थोडे आंबट होते पण त्या पठ्ठ्याने सर्व plate स्वच्छ केली! आम्ही ब्रेड-बटर खाल्लाच नाही, फक्त दोन अंडी व कॉफी घेतली. इथली दुधाची कॉफी जवळपास आपल्या कॉफीसारखी होती. कॉफी शॉप मध्ये एकदम स्ट्रॉंग कॉफी देतात. एक सफरचंद खाऊन साडेनऊला आम्ही बाहेर पडलो. मी स्वेटर घेतला नव्हता पण बाहेर पडल्यावर इतका थंड वारा होता की अगदी हुडहुडी भरल्यासारखे झाले. मग मिताली म्हणाली, “आई तू इथे थांब मी पटकन जाऊन माझं जॅकेट आणि तुझा स्वेटर घेऊन येते”. हा निर्णय किती योग्य होता हे आम्हाला नंतर समजले.

Hostel Avenue

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply