17 May
इथे एक छोटेसे बेट आहे- मार्गरेट आयलँड या नावाचे. या बेटाची लांबी 2.5 km व रुंदी 500 m असेल. या बेटावर जाण्याचा रस्ता पुलावरून होता. पुलावरून पायर्या उतरल्या की आपण बेटावरच उतरतो. मधून नदी वाहत असून त्यामुळे शहरात दोन भाग झाले आहेत आणि नदीच्या मध्ये हे मार्गरेट बेट तयार झाले आहे. बेट जरी लहान असले तरी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध होते बेटावर.

रोज गार्डन, मिनी zoo असून त्यात हरीण, ससे, मोर, बदक असे प्राणी होते तसेच छोटे-छोटे food spots, रॉक अंड रोल pubs इत्यादी होते. तिथे वरती दोन झाडांच्या मधल्या भागात रंगीबिरंगी लाइट्स लावून कंदील लावले होते. संध्याकाळी लाईटs लावल्यावर ते दृश्य अतिशय रम्य दिसत होते. तिथे एक म्युझिकल फाउंटेन होता. वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर आणि लईनुसार कारंजातले पाणी वेगवेगळे आकार तयार करत होते. तसेच त्या कारंजात खालच्या बाजूला हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी रंगांचे दिवे लावले होते. खूप उल्हासित वाटत होते ते बघताना.


बागेचा तो एरिया बराच मोठा होता. आम्ही ठरवले की तिथे इलेक्ट्रिक स्कूटर आणि सायकलचा वापर करावा. चालण्यापेक्षा इलेक्ट्रिक स्कूटर जास्त better. पण त्या स्कूटर्स अनलॉक होईना. मग आम्ही साध्या सायकल्स रेंट केल्या. जेमतेम काही मिनिटे सायकल चालवली असेल, अचानक जोरात पाऊस सुरू झाला. आम्ही सायकलs park करून जरा वेळ आडोशाला थांबलो. काही वेळाने पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही बराच वेळ सायकल चालवली. दोन ते तीन तास आम्ही या बेटावर फिरलो.

मग हॉस्टेलवर जायच्या आधी इथली एक स्पेशालिटी आहे Langos म्हणून- ते खायला “रेट्रो langos” नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. Langos म्हणजे भटूरा- त्यावर भरपूर चीज, कांदा, सिमला मिरची, ग्रीन ऑलिव्हs वगैरे पसरून त्याचा रोल बनवून तो तळतात व सर्व्ह करताना त्यावर टोमॅटो सॉस, mayonnaise घालून देतात. अतिशय स्वादिष्ट पण थंड झाला तर तो चिवट होतो. त्यामुळे अगदी गरम असतानाच खायचा. एका langosमध्ये आमच्या दोघींचे पोट आरामात भरले. एका langosची किंमत होती 1790 Forint. असो. मग रमत-गमत आम्ही होस्टेलला आलो. इथे रेग्युलर सिटी बसेस निळ्या रंगाच्या, लोकलs आणि मेट्रोs पांढऱ्या रंगाच्या व trams व टॅक्सी पिवळ्या रंगाच्या होत्या.









Leave a Reply