Mallorca, Spain

9 May

Mallorca island, Spain

हे एक स्पॅनिश बेट आहे. या वेळी आम्ही विमानाने प्रवास करायचे ठरवले आहे कारण अंतर बरेच जास्त आहे; जवळपास तीन हजार किलोमीटर. आमची फ्लाईट संध्याकाळी सव्वा चार वाजताची होती घरून दुपारी 1:45ला निघालो. दोन वाजताची ट्रेन थेट विमानतळावर घेऊन जाणार होती. प्रवास साधारण अर्ध्या तासाचा होता. 2:30ला विमानतळावर पोचलो याआधीच्या आमच्या trips ट्रेन आणि बसने केल्या होत्या. त्यावेळी आम्ही बरोबर दुधाची छोटी डबी आणि दह्याच्या प्लास्टिक डब्या घेतल्या होत्या. Somehow मितालीच्या डोक्यातून निघून गेले की फ्लाइटs ला द्रवपदार्थाची लिमिट 100 मिलीलीटर पेक्षा कमी आहे. आम्ही नेहमी सारखे दूध व दही हे दोन्ही 100ml पेक्षा जास्त असे घेतले होते. Check-in मध्ये त्या दोन्ही डबा काढून घेतल्या! मग आमच्याकडे जवळपास दीड तास होता. विमानतळाच्या ड्यूटी फ्री दुकानांमध्ये विंडो शॉपिंग केले. साधारण 3:30ला boardingच्या रांगेमध्ये उभे राहिलो, जिथे पासपोर्ट आणि तिकीट तपासतात.

इथे ज्या देशांतर्गत विमानसेवा असतात त्याचे जर तुम्ही आधी booking केले तर ते तिकीट खूप स्वस्तात मिळते. फक्त तुम्हाला जर जवळजवळ बसायचे असेल तर जास्तीचे पैसे, म्हणजे डबल amount भरावी लागते. मितालीची सीट नंबर होती 10B आणि माझी 15A. माझी खिडकी जवळची सीट होती आणि मितालीची मधली. आम्ही ठरवले होते की आपण सीट्स अदलाबदल करू. विमानाचं दार बंद झाले, आता कोणीच येणार नव्हते आणि माझ्या बाजूच्या seats रिकाम्या होत्या. विमानाचं टेक-ऑफ झाल्यावर मात्र मिताली तिचं सामान घेऊन माझ्या बाजूला बसायला आली. अडीच तीन तासाचा प्रवास होता आणि मितालीला ऑफिसचे काम होते बरेच. त्यामुळे जवळजवळ अडीच तास ती लॅपटॉपवर काम करत बसली होती. मी जरा वेळ झोप काढली आणि मग मोबाईल बघत बसले. विमान वेळेपूर्वी पोचले आणि लँडिंग अगदी smooth झाले. मग विमानतळावरून आम्ही बस पकडली आणि आमच्या राहण्याच्या ठिकाणाच्या दोन स्टॉप आधी उतरलो. तिथे मोठे अंडरग्राउंड बस स्टेशन आहे. तिथून बेटावरच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी बसेस सुटतात. आम्ही दुसऱ्या दिवशीचे लाईट हाऊससाठी बुकिंग केले. तिथल्या सुपरमार्केटमधून दूध आणि दही घेतले. जेवणासाठी पोळ्या आणि सुके पिठले करून आणले हो.ते मग प्रथम आम्ही ताक केले आणि पिठले-पोळी गरम करून खाल्ली. जेवल्यावर जरा वेळाने मस्त कॉफी घेतली, मग मस्त गरम पाण्याने अंघोळ केली आणि कपडे बदलून दुसऱ्या दिवसाची तयारी करून झोपलो. आमच्या होस्टेलचे नाव Urban हॉस्टेल असे होते.

Cap de Formentor Lighthouse (10 May)
Mallorcaच्या buses

सकाळी उठून आम्ही ब्रेड-बटर, cupcakes आणि कॉफी असा नाश्ता केला. त्यानंतर बसने आम्ही अंडरग्राउंड बस स्टेशनला गेले. आमची बस 11 वाजताची होती. आम्हाला बसमध्ये बसायला व्यवस्थित जागा मिळाली. दुपार होत आली असल्याने बाहेर चांगलेच तापले होते. जरा स्थिरस्थावर झाल्यावर मितालीने ड्रायव्हरला जाऊन विचारले की यानंतरची साडेबाराची पुढची बस आहे ती आम्हाला मिळेल का? त्यावर ड्रायव्हरने सांगितले की- हो, नक्कीच मिळेल! बरोबर 12:30ला बस स्टॉप वर उतरलो तर तिथे आमची पुढची बस उभीच होती. आम्हाला खूप आनंद झाला! अत्यंत खुषीत बसमध्ये चढणार तेवढ्यात बस ड्रायव्हरने सांगितले की ती बस ज्या मार्गाने जाते त्या मार्गावर अपघात झाल्यामुळे ही 12:30ची बस रद्द केली आहे. साधारण अर्ध्या-पाऊण तासात तो रस्ता clear होईल; पुढची बस 1:25ला आहे.

पुढे वाचा…

Beach visit

आम्ही दोघी सहा वाजेपर्यंत रुमवर पोचलो. मग समुद्र किनार्‍यावर जाण्यासाठी फ्रेश झालो- कपडे बदलले, कॉफी घेतली, मी बूट काढून चपला घातल्या. आमच्या रूम पासून पाच मिनिटाच्या अंतरावर समुद्रकिनारा आहे पण तो किनारा म्हणजे आपल्या मरीन ड्राईव्ह सारखा. तिथे पाण्यात उतरता येत नाही; तुम्ही काठावर बसून आनंद घेऊ शकता. मितालीने शोधून काढले की अगदी प्रॉपर बीच वर जाण्यासाठी बसचा पंधरा मिनिटाचा प्रवास आहे. आम्ही तिथेच जाण्याचे ठरवले. मितालीने स्विमसुटपण बरोबर घेतला. आम्ही बसने त्या स्टॉपवर उतरलो. तिथे beach वर जाण्यासाठी एक अरुंद बोळ होता आणि उतरून समुद्रापर्यंत जाण्यासाठी 85 पायऱ्या होत्या. नाशिकच्या घराला लागून जशा पायऱ्या होत्या तशाच पायऱ्या. फरक एवढा की हा सलग बोळ शेवट पर्यंत होता. बाजूला बसायला मध्ये मध्ये दगडी बाक होते. तिथे खाली उतरल्यावर आम्ही रिकामी जागा शोधून बरोबर नेलेली चादर अंथरली. त्यावर आमची पिशवी व इतर सामान ठेवले. मग आम्ही पाण्यातून बराच वेळ चाललो.

Palma de Mallorca beach

तिथे एक उंच खडबडीत खडक होता. त्या खडकावर मधून मधून रेती असलेल्या सपाट जागा होत्या जिथे तुम्ही पाय ठेवू शकता. ते सोडून बाकी सगळीकडे अत्यंत अणुकुचीदार दगडाची टोके होती. आमच्या पायात चप्पल देखील नव्हती. मितालीने प्रथम वर चढता येते का याचा अंदाज घेतला, खडकाचे इन्स्पेक्शन केले आणि मग मला हात देऊन वरती चढवले. त्या मोकळ्या जागेत पाय ठेवायची कसरत करत बरेच फोटो काढले.

तोपर्यंत सूर्यास्त होत आला होता. सूर्यास्त झाला की एक तर फोटो पण व्यवस्थित येत नाही व थंडी एकदम वाढते. म्हणून आम्ही खडकावरुन खाली उतरून आमचे सर्व सामान आवरून परत 85 पायऱ्या चढायला सज्ज झालो. मध्ये जरा वेळ बाकावर बसून मितालीने दुसऱ्या दिवशीचे स्कुबा डायविंगचे बुकिंग confirm केले. पहिल्यांदा आम्ही स्नोरकेलींगचे बुकिंग केले होते जे दोन तासाचे असते; त्याच बरोबर आम्ही caves बघायचे ठरवले होते. स्कुबा डायविंग चार तासाचे होते. आम्ही विचार केला- Caves आपण पुढच्या वर्षी देखील बघू शकतो, पण स्कुबा डायविंगसाठी पुढचे वर्ष माझ्या दृष्टीने जरा जास्त होईल. Once-in-a-lifetime सारखा experience घ्यावा म्हणून मितालीने स्कुबा डायविंग ऑप्शन fix केला.

पायऱ्या चढून वर आलो. परत होस्टेलला जातानाचा बस स्टॉप आम्हाला मिळालाच नाही. जवळजवळ एक stop पुढे चालत गेलो. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. पुढच्या स्टॉपला आम्हाला बस मिळाली. पण सुपर मार्केटमध्ये आम्हाला जायला मिळाले नाही. इथे सुपरमार्केट साडेनऊ वाजता बंद होतात. आमच्याकडे pumpkin soupsची पाकीटे होती आणि आम्ही सुपर मार्केटमधून ब्रेड घ्यायचे ठरवले होते. बसमधून उतरलो तेव्हा 09:40 झाले होते. आता काय करायचं या प्रश्नाचे उत्तर मितालीने शोधून ठेवले होते. ती म्हणाली की पाच-सात मिनिटावर जयपुर नावाचे इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊन आपण जेवणच करू!

ओवा घातलेला चहा

आम्ही या रेस्टॉरंटच्या आत शिरलो. बाहेरसुद्धा खुर्च्या-टेबल टाकून बसायची सोय होती. बहुतेक लोक बाहेरच बसले होते, त्यामुळे आत कोणीच नव्हते. आतमध्ये दोन-तीन रूमs मध्ये खुर्च्या-टेबल मांडले होते. एकंदरीत रंगरूप छान होते. इथे इंडियन रेस्टॉरंट म्हणजे आत एक गणपतीची मोठी मूर्ती, गौतम बुद्धाची मूर्ती आणि सरस्वतीची मूर्ती या मुर्त्या असतातच; याशिवाय शंकर-पार्वतीचा फोटो तसेच राम-लक्ष्मण-सीता यांचा फोटो हे पण असतात. आम्ही रोटी आणि दाल तडका मागवले. आम्हाला एकदम इन्सब्रुकचे रामा इंडियन हॉटेल आठवले; तिथला सुंदर चहा आठवला. लागलीच आम्ही चहा मागवायचे ठरवले. आम्हाला वाटले की आम्हाला आधी चहा आणून देतील पण साधारण पंधरा मिनिटात त्यांनी डायरेक्ट एका छोट्याश्या मेणबत्तीचा standवर गरम डाळ आणि एका टोपलीत रोटी आणून दिली. गरमागरम रोटी आणि डाळ अप्रतिम होती. जेवण झाल्यावर त्याने चहा आणि बरोबर साखरेच्या पुड्या आणून दिल्या. चहाचा एक घोट घेतला तर काय चहाला ओव्याची स्ट्रॉंग चव होती! याक!!! आमच्या तोंडाची चवच गेली. एरवी मिताली चहामध्ये साखर अजिबात घेत नाही, पण या चहामध्ये साखरेशिवाय पर्याय नव्हता. साखर घातल्यावर चहा घेण्या लायक झाला. असो. त्याला याबद्दल सांगावेसे वाटले पण विचार केला जाऊदे आणि बरं झालं सांगितलं नाही ते. जेव्हा बिल मागवले तेव्हा त्यांना आपण होऊन सांगितलं की चहा रेस्टॉरंटतर्फे होता म्हणून. मग आम्ही चालत होस्टेलला पोहोचलो.

Scuba diving (11 May)

अगदी बरे झाले आम्ही रात्रीच आंघोळ केली ते. सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होस्टेलला पाण्याचा थेंब नव्हता. त्यामुळे आठ वाजता पाणी आल्यावर आम्ही ब्रश केला व ब्रेकफास्टसाठी गेलो. आता होस्टेलच्या ब्रेकफास्ट विषयी थोडेसे. बहुतेक ठिकाणी 9 ते 11 किचन ओट्यावर सर्व ब्रेकफास्ट मांडून ठेवलेले असते. ब्रेड, बटर, कप केक, कॉफीच्या बाटल्या, कॉफी मेकिंग मशीन, उकडलेली अंडी, दोन-तीन प्रकारचे ज्यूस, कॉर्नफ्लेक्स यातील थोड्याफार फरकाने कमी-जास्त असतेच असते. दुधाच्या बाटल्या सुद्धा असतात. यामध्ये काही ठिकाणी सोयामिल्क पण असते, Vegan लोकांसाठी.

पुढे वाचा…

Pages: 1 2

काही किस्से

1 April

आज सकाळी दोन डिग्री temperature होते पण मिताली सकाळी पावणेसातला सर्व तयारी करून खाद्यतेलाच्या शोधार्थ बाहेर पडली. तिने बसने जाऊन आजूबाजूच्या सुपर मार्केटमध्ये शोधले पण तिला कुठेच मिळाले नाही. एका outlet मध्ये ऑनलाइन मागवण्याची सोय होती आणि वन पर्सन वन बॉटल. मितालीने लगेच ऑनलाईन ऑर्डर केली आणि येताना इकडचा बेकरी प्रॉडक्ट Croissant घेऊन आली.

हा फ्रेंच बेकरी प्रॉडक्ट आहे. त्याचे वेगवेगळे आकार असतात तसेच plain आणि गोड असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे खारी असते ती crispy असते. तर तसे यात खारी सारखे layers असतात पण सॉफ्ट असते. फक्त वरचा layer crispy असतो आत मधे पावासारखे texture असते. तेलाचा प्रश्न सुटला असे वाटत असतानाच तिला email मिळाला की तेलाची ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल झाली!

2 April

मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा त्रास आहे वगैरे वगैरे.

Read more…

8 April

आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो.

Read more…

Leave a Reply