Skip to content
माझी 2nd Innings

माझी 2nd Innings

माय लेकीचा प्रवास

  • Scuba diving

    अगदी बरे झाले आम्ही रात्रीच आंघोळ केली ते. सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होस्टेलला पाण्याचा थेंब नव्हता. त्यामुळे आठ वाजता पाणी आल्यावर आम्ही ब्रश केला व ब्रेकफास्टसाठी गेलो. आता होस्टेलच्या ब्रेकफास्ट विषयी थोडेसे. बहुतेक ठिकाणी 9 ते 11 किचन ओट्यावर सर्व ब्रेकफास्ट मांडून ठेवलेले असते. ब्रेड, बटर, कप केक, कॉफीच्या बाटल्या, कॉफी मेकिंग मशीन, उकडलेली अंडी,…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Cap de Formentor

    10 May सकाळी उठून आम्ही ब्रेड-बटर, cupcakes आणि कॉफी असा नाश्ता केला. त्यानंतर बसने आम्ही अंडरग्राउंड बस स्टेशनला गेले. आमची बस 11 वाजताची होती. आम्हाला बसमध्ये बसायला व्यवस्थित जागा मिळाली. दुपार होत आली असल्याने बाहेर चांगलेच तापले होते. जरा स्थिरस्थावर झाल्यावर मितालीने ड्रायव्हरला जाऊन विचारले की यानंतरची साडेबाराची पुढची बस आहे ती आम्हाला मिळेल का?…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Prague

    29 April आज आम्ही Czech Republic देशातल्या Prague या शहरात फिरणार होतो. मिताली या आधी तिथे तीन-चार वेळा जाऊन आली आहे. आजचा प्रवास साडेचार ते पाच तासांचा अजून बसचा होता. आम्ही सकाळी सहा वाजता उठलो. सगळे आवरून साडेसातला निघायचे ठरले होते. पण आम्हाला निघायला काही मिनिटे उशीर झाला. आम्ही प्लॅटफॉर्मला पोहोचलो आणि आमच्या डोळ्यासमोरुन ट्रेन…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • St. Gallen, Switzerland

    14 April आम्ही बरोबर 6:05ला घराबाहेर पडलो. तिथून दोन मिनिटावर बस स्टँड होता. बस घेऊन आम्ही स्टेशनला वेळेआधीच पोचलो. दोन ट्रेन बदलून आम्ही स्विझर्लंडला पोचलो. स्टेशनचं नाव St. Gallen. तिथून Cheese फॅक्टरीला बसने गेलो. Cheese factory पुढे वाचा… Chocolate factory चॉकलेट फॅक्टरीचे नाव होते Maestrani चॉकलेट फॅक्टरी! ही फॅक्टरी Switzerlandमध्ये असून 1829 साली सुरू झाली.…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Innsbruck

    15 April आज आम्ही इन्सब्रुक शहरात आलो आहे. Inn (इन) Austriaमधील नदी आहे. तिच्या काठावर हे शहर वसले आहे त्यामुळे शहराचे नाव इन्सब्रुक असे पडले. नदीचे पात्र बरेच मोठे आहे पण शहरातून जाताना काही ठिकाणी हे पात्र छोटे व निमुळते झालेले आहे. अतिशय स्वच्छ आणि नितळ पाणी घेऊन वाहते ही नदी. या शहराची दुसरी खासियत…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Chocolate factory

    14 April चॉकलेट फॅक्टरीचे नाव होते Maestrani चॉकलेट फॅक्टरी! ही फॅक्टरी Switzerlandमध्ये असून 1829 साली सुरू झाली. आम्ही तिथे गेल्यावर आमचे तिकीट दाखवल्यावर गेट उघडले गेले आणि आम्ही चॉकलेटच्या दुनियेत शिरलो. तिथे शिरल्याबरोबर समोरच खूप सारे cowbells एकत्र पुंजक्याने आठ ते दहा फूट उंचीपर्यंत लावल्या होत्या. मग तिथे चॉकलेटचा शोध कसा लागला यावर एक शॉर्ट…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Cheese factory

    14 April आम्ही बरोबर 6:05ला घराबाहेर पडलो. तिथून दोन मिनिटावर बस स्टँड होता. बस घेऊन आम्ही स्टेशनला वेळेआधीच पोचलो. दोन ट्रेन बदलून आम्ही स्विझर्लंडला पोचलो. स्टेशनचं नाव St. Gallen. तिथून Cheese फॅक्टरीला बसने गेलो. Cheese फॅक्टरीमध्ये इतकी इंटरेस्टिंग आणि informative sessions होते की तिथे एक तास ऐवजी दोन ते अडीच तास कसे गेले ते आम्हाला…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Zugspitze (13 April)

    सकाळी सर्व आवरून आम्ही ट्रेनने Garmisch या स्टेशनला आलो. तिथे रेल्वेच्या locker रूममध्ये सर्व सामान ठेवले व मोजके सामान, म्हणजे एक छोटीशी bag- त्याच्यामध्ये पाण्याची बाटली आणि माझी पर्स, एवढेच घेऊन आम्ही टॉय ट्रेनने Lake Eibsee या पॉइंट पर्यंत आलो. तिथे cable carचा पॉइंट होता. The Zugspitze– जर्मनीतील सर्वात उंच ठिकाण! याची उंची 2960 मीटर्स…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Easter trip (12 April)

    Munich आम्ही पहाटे तीन वाजता उठलो. आंघोळ आदल्या रात्रीच केली होती, त्यामुळे उठून ब्रश केला आणि चहा घेऊन आम्ही सव्वाचारला घराबाहेर पडलो. साडेचारच्या बसने रिजनल ट्रेन स्टेशनला जाऊन तिथून त्या ट्रेनने निघालो. ट्रेन अगदी वेळेवर होती. ती ट्रेन Berlin स्टेशनला 5:20ला पोहोचणार होती पण नशीब असे की आमचे स्टेशन यायच्या दोन-तीन मिनिटे आधी ती ट्रेन…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • 8 April

    आज मला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला. खरेच वाटत नाही. इतके दिवस कसे संपले ते कळलेच नाही. आज आम्ही Berlinला गेलो होतो. आम्ही dmनावाच्या स्टोअर मध्ये गेलो. तिथे शाम्पू, कंडिशनर, तेल वगैरे घेऊन Woolworthमध्ये गेलो. तिथे चारूच्या आईसाठी हवी असलेली पर्स घेतली नंतर माझ्यासाठी sunglasses घेतले. Kaufland नावाच्या अजस्त्र किराणा दुकानात शिरलो. तीन मजल्यावर…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
←Previous Page
1 2 3 4
Next Page→

Blog at WordPress.com.

  • Subscribe Subscribed
    माझी 2nd Innings

    Have a WordPress.com account? Log in now.

  • माझी 2nd Innings
    View site in Reader
    Manage subscriptionsSign upLog in
    Report this content
    Collapse this bar